AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिल्डिंग करताना आमच्यात वाद व्हायचा! रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने गुपित केलं उघड

टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या कार्यक्रमात या दोघांनी फिल्डिंगबाबत एक खुलासा केला आहे. धावा किंवा विकेटसाठी नाही तर फिल्डिंगवरून या दोघांमध्ये वाद व्हायचा. दोघांनीही मजेशीर अंदाजात हे गुपित उघड केलं आहे.

फिल्डिंग करताना आमच्यात वाद व्हायचा! रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने गुपित केलं उघड
फिल्डिंग करताना आमच्यात वाद व्हायचा! रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने गुपित केलं उघडImage Credit source: Ryan Pierse/Getty Images
| Updated on: Jun 07, 2025 | 4:41 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी फॉर्मेटमधून रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली आहे. तर चेतेश्वर पुजारा संघात नाही पण निवृत्त झालेला नाही. पण या दोघांनी भारतीय कसोटी संघात बराच काळ एकत्र घालवला आहे. नुकतेच हे दोघंही एका व्यासपीठावर एकत्र आले होते. चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजाराने ‘द डायरी ऑफ ए क्रिकेटर वाइफ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी मजेशीर अंदाजात काही खुलासे केले. रोहित शर्मा कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीच्या सुरुवातीला पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजीला यायचा. तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. यावेळी दोघांमध्ये रन्स किंवा विकेटवरून नाही तर फिल्डिंगसाठी भांडायचे. असं का आणि कशासाठी याचा खुलासा रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी केला आहे.

रोहित शर्माने हसत सांगितलं की, ‘आम्ही कायम भांडायचो की कोण शॉर्ट लेगला उभा राहील आमि कोण सिली पॉइंटला? आणि पुज्जी (पुजारा) कायम सांगायचा की मी तीन नंबरवर खेळण्यासाठी येतो. त्यामुळे तुझ्यापेक्षा जास्त आरामाची गरज आहे. यासाठी तिथे फिल्डिंग कर.’ तेव्हा रोहित शर्मा पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. यावर चेतेश्वर पुजाराने रोहित शर्माला अडवलं आणि सांगितलं की, ‘पण जेव्हा रोहितने कसोटीत ओपनिंग सुरु केली तेव्हा सर्व काही बदललं. तेव्हा त्याने सांगितलं की मी ओपनर आहे. यासाठी तू शॉर्ट लेगला उभा राहा. तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. तेव्हा मी फक्त तिथे जायचो.’

… जेव्हा पुजाराभोवती गराडा पडला होता

रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी एक 2012 मधील एक मजेदार किस्सा सांगितला. दोन्ही खेळाडू इंडिया ए साठी त्रिनिदाद आणि टोबॅगो खेळण्यासाठी गेले होते. रोहितने सांगितलं की, पुजारा शाकाहारी जेवणासाठी रात्री हॉटेल शोधत होता. तेव्हा खेळाडूंना सांगितलं होतं की रात्री कोणीही बाहेर जाणार नाही. हॉटेलमधून निघाल्यानंतर लोकांनी पुजाराला गराडा घातला. मोठ्या कष्टाने कसाबसा त्यातून बाहेर आला.

रोहित शर्माने पुजाराचं कौतुक करताना सांगितलं की, क्रिकेट कारकि‍र्दीच्या सुरुवातीला पुजाराच्या दोन्ही गुडघ्याच्या एंटीरियर क्रूसिएट लिगामेंटला दुखापत झाली होती. असं असूनही त्याने 100 हून अधिक कसोटी सामने खेळले. ही खूप मोठी गोष्ट आहे. पुजाराने शेवटचा कसोटी सामना 2023 जूनमध्ये खेळला होता. त्याने आतापर्यंत 103 कसोटी सामन्यात 43.60 च्या सरासरीने 7195 धावा केल्या आहेत.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.