Cricket : 2 मालिका, 6 सामने आणि 15 खेळाडू, IPL दरम्यान वनडे सीरिजसाठी टीम जाहीर
Odi Cricket Series Schedule : क्रिकेट बोर्डाने आगामी 2 एकदिवसीय मालिकांसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. क्रिकेट बोर्डाने यासह कोचिंग स्टाफमध्येही बदल केला आहे. जाणून घ्या.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातून चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स आणि त्यानंतर सनरायजर्स हैदराबाद अशा 3 संघांचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. त्यामुळे आता प्लेऑफमधील 4 जागांसाठी 7 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. प्लेऑफच्या दृष्टीने प्रत्येक सामना हा निर्णायक आणि महत्त्वाचा आहे. त्यात आता क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी 2 एकदिवसीय मालिकेसाठी क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. या 2 पैकी एक मालिका ही आयपीएल दरम्यान खेळवण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. शाई होप हा विंडीजचं आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध नेतृत्व करणार आहे.
दोन्ही मालिकेसाठी ज्वेल एंड्रयू याचं संघात कमबॅक झालं आहे. शामर जोसेफ आणि मॅथ्यू फोर्ड हे दोघे बांगलादेश विरूद्धच्या मालिकेसाठी फिट नव्हते. मात्र त्यानंतर दोघांचं अखेर कमबॅक झालं आहे. तसेच अमीर जंगू याचाही एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.
आयर्लंड विरुद्ध विंडीज एकदिवसीय मालिका
- पहिला सामना, 21 मे, द व्हीलेज, डब्लिन.
- दुसरा सामना, 23 मे, द व्हीलेज, डब्लिन.
- तिसरा सामना, 25 मे, द व्हीलेज, डब्लिन.
इंग्लंड विरुद्ध विंडीज एकदिवसीय मालिका
- पहिला सामना, 29 मे, बर्मिंगघम
- दुसरा सामना, 1 जून, कार्डीफ
- तिसरा सामना, 3 जून, लंडन
कोचिंग स्टाफमध्ये बदल
वेस्ट इंडिज क्रिकेटने टीम जाहीर करण्यासह कोचिंग स्टाफमध्येही बदल केला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने जेम्स फ्रँकलिन याच्या जागी माजी वेगवान गोलंदाज रवी रॉमपॉलची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती केली आहे. वेस्ट इंडिजने 2012 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. रवी रॉमपॉल हा त्या वर्ल्ड कप विजेच्या संघाचा सदस्य होता. तसेच केविन ओब्रायन हा आयर्लंड विरूद्धच्या मालिकेदरम्यान कोचिंग स्टाफसह जोडला जाणार आहे.
विंडीडकडून एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर
CWI Announces Squad for The West Indies ODI Tours of Ireland and England.
Read More🔽 https://t.co/IUhdQbsthP
— Windies Cricket (@windiescricket) May 5, 2025
आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिज टीम : शाई होप (कर्णधार), ज्वेल एंड्रयू, केसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टीन ग्रीव्स, अमीर जंगू, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोटी, शेरफेन रदरफोर्ड, जेडन सील्स आणि रोमारियो शेफर्ड.
