Icc World Cup 2024 आधी मोठा धक्का, दुखापतीमुळे स्टार ऑलराउंडर स्पर्धेतून आऊट, या खेळाडूला संधी
T20 World Cup 2024: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी स्टार ऑलराउंडर दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे टीमला मोठा झटका लागला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्याचा थरार सुरु आहे. दोन्ही संघांमध्ये ट्रॉफीसाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे. या स्पर्धेनंतर टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. टीम इंडियाची पहिली तुकडी वर्ल्ड कपसाठी यूएसएमध्ये दाखल झाली आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे.आयसीसीने सोशल मीडियावरुन मोठी बातमी क्रिकेट चाहत्यांसह शेअर केली आहे.
यजमान वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला मोठा झटका बसला आहे. विंडिजचा अनुभवी आणि उंचपुरा ऑलराउंडर खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. जेसन होल्डर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आयसीसीने सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध पत्रकात याबाबतची महिती दिली आहे. जेसन होल्डर याच्या जागी ओबेद मकॉय याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
वेस्ट इंडिज सी ग्रुपमध्ये
वेस्ट इंडिज वर्ल्ड कपसाठी सी ग्रुपमध्ये आहे. विंडिजसह न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनिआ आणि यूगांडाचा समावेश आहे. विंडिज आपला सलामीचा सामना हा 2 जून रोजी पापुआ न्यू गिनिआ विरुद्ध खेळणार आहे.
विडिंजला मोठा धक्का
West Indies dealt with a huge blow ahead of the ICC Men’s #T20WorldCup 2024!https://t.co/zWbfrX2nxx
— ICC (@ICC) May 26, 2024
वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज टीम : रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, ओबेद मकॉय, शाई होप, अकेल होसेन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड आणि रोमॅरियो शेरफर्ड.
