AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टी20 वर्ल्डकप 2022 च्या उपांत्य फेरीत नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या एका क्लिकवर

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांच्या 2022 वर्ल्डकपच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या भारताचा मार्ग इंग्लंडने अडवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन संघ आमनेसामने आल्याने धाकधूक वाढली आहे.

IND vs ENG : टी20 वर्ल्डकप  2022 च्या उपांत्य फेरीत नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या एका क्लिकवर
| Updated on: Jun 26, 2024 | 3:30 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी रंगला. या सामन्यातही भारताचं कर्णधारपद रोहित शर्मा आणि इंग्लंडचं कर्णधारपद जोस बटलरकडे होतं. त्यामुळे पुन्हा घडाळ्याची चक्र उलटी फिरून तसंच काहीसं घडत असल्याचं दिसत आहे. टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. पण नियतीच्या मनता काही वेगळंच होतं. इंग्लंडने भारताला 10 विकेट आणि 24 चेंडू राखून पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 168 धावा केल्या आणि विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने 16 षटकात एकही गडी न गमवता पूर्ण केलं.

केएल राहुल आणि रोहित शर्मा ही जोडी ओपनिंगला उतरली होती. केएल राहुल 5 धावा करून ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण रोहित शर्मा 27 धावा करून बाद झाला. तर विराट कोहलीने 40 चेंडूत 50 धावा केल्या. सूर्यकुमार यादव काही खास करू शकला नाही. 10 चेंडूत 14 धावांवर त्याचा खेळ आटोपला. हार्दिक पांड्याने यावेळी चांगली खेळी केलीय. 33 चेंडूत 63 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 5 षटकार मारले. ऋषभ पंत 6 धावांवर असताना रनआऊट झाला. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने 2, अदिल राशिदने 1 आणि ख्रिस वोक्सने 1 विकेट घेतली.

जसप्रीत बुमराहची उणीव या सामन्यात प्रकर्षाने दिसून आली. त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीकडे होती. पण त्यांना विकेट घेता आली नाही. जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांनी विजयी भागीदारी केली. जोस बटलरने नाबाद 80 आणि एलेक्श हेल्सने नाबाद 86 धावा करत टीमला जिंकवून दिलं. तसेच अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं.

आता भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. तारीख आणि ठिकाण वेगळं असलं तरी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना आहे. बरंच काही साम्य आहे. काही खेळाडू तेच आहेत. तर कर्णधाराच्या भूमिकेतही जोस बटलर आणि रोहित शर्मा आहे. त्यामुळे या उपांत्य फेरीत काय होते? याची उत्सुकता लागून आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....