AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 गुणतालिकेत टॉप 2 स्थान मिळण्यासाठी आरसीबी आणि एसआरएचला काय करावं लागणार? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी स्थान मिळवलं आहे. पण आता या दोन संघात टॉप 2 मध्ये राहण्याची चुरस आहे. चला जाणून या दोन संघांना काय करावं लागणार ते...

IPL 2026 गुणतालिकेत टॉप 2 स्थान मिळण्यासाठी आरसीबी आणि एसआरएचला काय करावं लागणार? जाणून घ्या
IPL 2026 गुणतालिकेत टॉप 2 स्थान मिळण्यासाठी आरसीबी आणि एसआरएचला काय करावं लागणार? जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 22, 2026 | 5:41 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 67व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. असं असताना आता या दोन संघात गुणतालिकेतील टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याची धडपड आहे. आरसीबीने आतापर्यंत 13 सामन्यात 9 सामने जिंकले आहेत. तसेच पदरात 18 गुण असून नेट रनरेट हा +1.065 आहे. यासह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने 13 सामन्यापैकी 8 सामने जिंकले असून 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादचे नेट रनरेट हा +0.350 आहे. पण या दोघांच्या मधे म्हणजेच दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. गुजरात टायटन्सने 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला असून 18 गुण आणि +0.695 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 2 मध्ये जागा पक्की करण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्याचं गणित समजून घेऊयात

आरसीबीचं गणित कसं असेल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा टॉप 2 मधील प्रवास सोपा आहे. सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं तर 20 गुण होतील. त्यामुळे आसपास कोणीच नाही. त्यामुळे अव्वल स्थान कायम राहील. तसेच क्वॉलिफायर 1 खेळण्याची संधी मिळेल. आरसीबीने विजय मिळवला तर गुजरात टायटन्सचं दुसरं स्थानही कायम राहील. अशा स्थितीत आरसीबी आणि गुजरात टायटन्स हे क्वॉलिफायर 1 मध्ये खेळतील. अव्वल दोनमध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी केवळ दोन संधीच मिळत नाहीत, तर एलिमिनेटरमधील थेट बाद होण्याचा दबावही टाळता येतो. दुसरीकडे, आरसीबीने हा सामना मोठ्या फरकाने गमावला तर गुजरातची तिसऱ्या स्थानावर घसरण होईल. तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर खेळेल.

सनरायझर्स हैदराबादचं गणित काय?

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादला अव्वल स्थान गाठणं सोपं नाही. कारण नेट रन रेटमधील तफावत दूर करण्यासाठी आरसीबीला नुसतं हरवून चालणार नाही. यासाठी मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची प्रथम फलंदाजी आली तर सामना किमान 87 धावांनी जिंकावा लागेल. जर धावांचा पाठलाग करावा लागला तर दिलेलं लक्ष्य 11 षटकात पूर्ण करावं लागेल. विशिष्ट परिस्थितीत 11.3 षटकेदेखील पुरेशी ठरू शकतात. त्यामुळे गुजरात टायटन्सचं या सामन्याकडे लक्ष असणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...