Video : पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्याआधीच रोहित शर्माच्या उत्तराने सोशल मीडियावर चर्चा, म्हणाला की…
आयपीएल एलिमिनेटर फेरीत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली होती. आता क्वॉलिफायर 2 फेरीतही तशीच अपेक्षा आहे. असं असताना रोहित शर्माला त्याच्या फलंदाजीच्या कमकुवत बाजूबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिलं ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या उत्तराने चाहते खूश झाले आहेत.

मुंबई इंडियन्सकडून सलामीला उतर रोहित शर्मा एक चांगली सुरुवात करून देतो. सध्या फॉर्मात नाही पण एलिमिनेटर सामन्यात त्याने फलंदाजीचा क्लास दाखवला. 81 धावांची खेळी करत गुजरातच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडला. दोन जीवदान मिळाल्याने रोहित शर्माने त्याचा पुरेपूर फायदा उचलला. दुसरीकडे, रोहित शर्मा त्याच्या बोलण्याच्या शैलीने मैदानात प्रसिद्ध आहे. अनेकदा स्टम्प माईकमध्ये त्याचं बोलणं रेकॉर्ड झालं आहे. पण त्याच्या विनोदबुद्धीचं अनेकदा कौतुकही झालं आहे. असाच एक प्रकार मैदानाबाहेर घडला. एका चाहत्याने रोहित शर्माला एक प्रश्न विचारला आणि त्याचे आश्चर्यकारक उत्तर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं हे कधी आणि कुठे हे मात्र कळू शकलं नाही. पण सोशल मीडियावर त्याच्या उत्तराची चर्चा रंगली आहे. एका कार्यक्रमात चाहत्याला रोहित शर्माशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तेव्हा चाहत्याने रोहित शर्माला हिम्मत करत बाद करण्याचा प्रश्न विचारला.
“सर, तुम्हाला कसं आऊट करायचं?” असा प्रश्न चाहत्याने विचारला. त्यावर रोहित शर्माने पटकन उत्तर दिलं की, नाही ते नाही होऊ शकत. त्यानंतर एका विचारलं की, “रोहित भाऊ, तुझ्या फलंदाजीत कोणती कमकुवत बाजू आहे? कृपया मला सांगशील का?” क्रिकेटपटूंना त्यांच्या कमकुवतपणाबद्दल उघडपणे बोलणे आवडत नाही, कारण त्यांच्या विरोधकांसाठी एक शस्त्र ठरते. पण रोहित शर्माने त्याच्याच शैलीत हसून चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले: “कमकुवतपणा? हो, एक आहे. तो म्हणजे… ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू सोडणे ही माझी कमजोरी आहे!” रोहित शर्माचं मजेदार उत्तर ऐकून चाहते आणि उपस्थित असलेले सर्वजण हसले.
“sir apako kaise out karne ka”?
Rohit Sharma 🗣️- “Nahi wo nahi ho skata”😂👌🏼 pic.twitter.com/KLjQJ6w0wh
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) May 31, 2025
गोलंदाज सहसा ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करून फलंदाजांना बाद करण्यासाठी प्रलोभित करण्याचा प्रयत्न करतात. पण तो चेंडू जाऊ देणे हा कमकुवतपणा आहे असं सांगत रोहितने सर्वांनाच आश्चर्यचकित केले नाही तर त्यांना हसायलाही भाग पाडले. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा कशी फलंदाजी करतो याकडे लक्ष लागून आहे. कारण अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम खूपच मोठं आहे. अशा स्थितीत या मैदानावर मोठी धावसंख्या करण्याचं आव्हान असणार आहे.
