AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: दुसऱ्या दिवसापासून…! श्रीलंकेने सामना कुठे गमावला? कर्णधार धनंजय डिसिल्वाने असं मांडलं गणित

भारताने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला 165 धावांनी नमवलं. हा पराभव श्रीलंकन कर्णधार धनंजय डिसिल्वा याच्या जिव्हारी लागला आहे. त्याने या सामन्यात कुठे गणित चुकलं ते सांगून टाकलं.

IND vs SL: दुसऱ्या दिवसापासून...! श्रीलंकेने सामना कुठे गमावला? कर्णधार धनंजय डिसिल्वाने असं मांडलं गणित
IND vs SL: दुसऱ्या दिवसापासून...! श्रीलंकेने सामना कुठे गमावला? कर्णधार धनंजय डिसिल्वाने असं मांडलं गणितImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 19, 2026 | 6:21 PM
Share

India vs Sri Lanka Test Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सरशी घेतली. पहिल्या समन्यात श्रीलंकेला 165 धावांनी पराभवाची धूळ चारली. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. खरं तर या सामन्यावरची श्रीलंकेची पकड पहिल्या डावातच सैल झाली होती. कारण भारताला 178 धावांची आघाडी मिळाली होती. त्यात दुसऱ्या डावात भारतीय संघाने कशाबशा 193 धावा केल्या. 372 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 206 धावांवर आटोपला. या पराभवामुळे श्रीलंकन कर्णधार धनंजय डिसिल्वा नाराज दिसला. त्याने चौथ्या डावात फलंदाजी करणं कठीण अशल्याचं अधोरेखित केलं. इतकंच काय तर पहिले तीन दिवस बरे गेले, पण त्यानंतर सर्व काही बदललं. नाणेफेकीचा कौलही महत्त्वाची भूमिका बजावून गेल्याचं सांगितलं.

कर्णधार धनंजय डिसिल्वा काय म्हणाला?

भारताविरुद्ध सामना गमावल्यानंतर झालेल्या बक्षीस सोहळ्याच्या कार्यक्रमात कर्णधार धनंजय डिसिल्वा याने आपली खंत मांडली. धनंजय डिसिल्वा म्हणाला की, ‘दुसऱ्या दिवसापासून आम्ही जास्तीत जास्त गेममध्ये होतो. मला वाटतं आमच्या खेळाडूंनी चौथ्या डावात चांगली लढत दिली. हे काही सोपं नव्हतं. मला वाटतं की एक चांगला सामना झाला.’ धनंजय डिसिल्वा खेळपट्टीबाबत म्हणाला की, ‘सुरूवातीचे तीन दिवस फलंदाजीसाठी चांगले होते. त्यामुळे गॉलमध्ये चौथ्या दिवशी सोपं नव्हतं. सर्वांना हे माहिती होतं. पण मला वाटतं की राहुल आणि पडिक्कलने चांगली सुरूवात करून दिली. त्यांच्या धावसंख्येमुळे आमच्यावर दबाव वाढला.’ धनंजय डिसिल्वाने पहिल्या डावात 21 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात 59 धावांवर खेळ आटोपला.

श्रीलंकन कर्णधार धनंजय डिसिल्वा याला नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरला का? असं विचारताच म्हणाला की, ‘कदाचित हा.. त्यांनी नाणेफेक जिंकून बोर्डवर धावा लावल्या. जेव्हा आम्ही फलंदाजीला आलो तेव्हा लवकर विकेट गमावल्या. तेथूनच आम्ही सामना गमावला.’ भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेला या सामन्यात विजय मिळवणं भाग आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर