AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्कलोड मॅनेजमेंट म्हणजे काय? जाणून घ्या भारतीय क्रिकेट संघामधील खेळाडूंच्या वर्कलोडचा नेमका हिशेब

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा वर्कलोड म्हणजेच कामाचा ताण हा एका ठरावीक पद्धतीने ठरवला जातो. चला, जाणून घेऊया हा निर्णय नेमका कसा घेतला जातो.

वर्कलोड मॅनेजमेंट म्हणजे काय? जाणून घ्या भारतीय क्रिकेट संघामधील खेळाडूंच्या वर्कलोडचा नेमका हिशेब
Indian Cricket TeamImage Credit source: PTI
| Edited By: | Updated on: Jul 22, 2025 | 4:42 PM
Share

जसप्रीत बुमराह मॅन्चेस्टर टेस्ट खेळणार का? भारताला लॉर्ड्समध्ये 22 धावांनी झालेल्या नाजूक पराभवानंतर चाहत्यांना सर्वात मोठा प्रश्न हाच सतावत आहे. 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत भारत 1-2 ने पिछाडलेला आहे, त्यामुळे मॅन्चेस्टरमध्ये परत फटका बसला, तर मालिका हाताातून जाते. पण जर येथे विजय मिळवला, तर सीरिज बरोबरीवर येऊन भारतासाठी अजूनही जिंकण्याची संधी आहे.

म्हणूनच बुमराहचा खेळणे फार महत्त्वाचे ठरतेय. पण त्याच वेळी त्याचा वर्कलोड म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताण हा मोठा मुद्दा ठरत आहे. बुमराह वारंवार दुखापतींना सामोरा गेलेला आहे. त्यामुळे इंग्लंड दौर्‍यावर त्याला पाचपैकी फक्त तीन टेस्ट खेळायला दिल्या जात आहेत, हेच त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटचं उदाहरण आहे.

वर्कलोड मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय?

वर्कलोड मॅनेजमेंट म्हणजे खेळाडूंवर, विशेषतः वेगवान गोलंदाजांवर येणाऱ्या ताणतणावाचं योग्य नियोजन. जे खेळाडू तीनही फॉरमॅटमध्ये खेळतात, त्यांच्यावर जास्त ताण येतो. त्यामुळे त्यांना दुखापतींपासून वाचवणं, त्यांची ताजेपणा राखणं आणि मोठ्या स्पर्धांसाठी पूर्णपणे तयार ठेवणं हे मुख्य उद्दिष्ट असतं.

वर्कलोड ठरवतो कोण?

भारतीय क्रिकेट संघात वर्कलोड मॅनेजमेंट एक टीमवर्क आहे. यात BCCI, नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA), मुख्य प्रशिक्षक, कॅप्टन आणि निवड समिती सामील असतात. हे सगळे मिळून खेळाडूंच्या फिटनेस, दुखापतींचा इतिहास, आणि येणाऱ्या सामने यांच्या आधारे निर्णय घेतात.

NCA ची भूमिका

बंगळुरूमधील NCA हा एक महत्त्वाचा सेंटर आहे. इथे खेळाडूंच्या फिटनेसचा डेटा, रिकव्हरी प्रोग्रॅम्स आणि वर्कलोड यांचं बारकाईने निरीक्षण केलं जातं. 2023 मध्ये BCCI ने 20 खेळाडूंच्या गटावर लक्ष ठेवण्याचं ठरवलं, जे आगामी वर्ल्ड कपसाठी प्रबळ उमेदवार आहेत.

कोच-कॅप्टन-निवड समिती यांचं समन्वय

वर्कलोड ठरवताना कोच, कॅप्टन आणि निवड समिती (ज्यांचं नेतृत्व मुख्य निवडकर्ता करतो) मिळून निर्णय घेतात. जसप्रीत बुमराहच्या बाबतीत याच समितीनं ठरवलं की तो फक्त 3 कसोटी खेळेल.

IPL फ्रँचायझीसोबतही समन्वय आवश्यक

IPL मध्ये खेळाडूंवर खूप ताण येतो. त्यामुळे BCCI आणि NCA, फ्रँचायझीसोबत समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण फ्रँचायझी नेहमीच आपल्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती द्यायला तयार नसतात. त्यामुळे BCCI केवळ सल्ला देऊ शकते, सक्ती नाही करू शकत.

फिटनेस टेस्ट आणि प्रोटोकॉल

BCCI ने यो-यो टेस्ट आणि डेक्सा स्कॅन हे फिटनेस टेस्ट अनिवार्य केले आहेत. शिवाय, खेळाडूंना घरच्या रणजी किंवा इतर घरेलू स्पर्धांमध्येही खेळणं बंधनकारक केलं आहे, जेणेकरून ते खेळत राहतील आणि मॅच फिट राहतील.

बुमराह-सिराजचं उदाहरण

बुमराहने लीड्समध्ये पहिला टेस्ट खेळून पाच विकेट घेतल्या. मग त्याला दुसऱ्या टेस्टसाठी विश्रांती देण्यात आली. लॉर्ड्समध्ये तो पुन्हा खेळला आणि तिथेही पाच विकेट घेतल्या. आता मॅन्चेस्टर टेस्टसाठी त्याचं निवडणं ही मोठी चर्चा आहे. टीमचे असिस्टंट कोच रयान टेन डोशेट म्हणाले, “बुमराहबाबत निर्णय मॅन्चेस्टरमध्ये घेतला जाईल. आम्ही त्याला खेळवायला उत्सुक आहोत, पण एकूण चित्र पाहायला हवं.”

सिराज सुद्धा या सीरिजमध्ये 13 विकेट्ससह सर्वोच्च विकेट टेकर आहे. त्यामुळे त्याच्यावरही लक्ष आहे. टेन डोशेट म्हणतात, “सिराज सतत लांब स्पेल्स टाकतो, त्यामुळे त्याचंही वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे.”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.