AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul : दिवसा वाचवलं, रात्री हटवलं, केएल राहुलकडून उपकर्णधारपद कोणी हिसकावलं?

KL Rahul : धावा आटल्या आहेत. त्यामुळे त्याच डिमोशन झालय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये केएल राहुल फ्लॉप ठरला. त्यानंतरही त्याला टेस्ट टीममध्ये कायम ठेवलय.

KL Rahul : दिवसा वाचवलं, रात्री हटवलं, केएल राहुलकडून उपकर्णधारपद कोणी हिसकावलं?
Kl rahulImage Credit source: PTI
| Updated on: Feb 20, 2023 | 1:13 PM
Share

KL Rahul demotion : टीम इंडियाचा टॉप ऑर्डरमधील बॅट्समन केएल राहुलचे सध्या खराब दिवस सुरु आहेत. त्याची बॅट चालत नाहीय. धावा आटल्या आहेत. त्यामुळे त्याच डिमोशन झालय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये केएल राहुल फ्लॉप ठरला. त्यानंतरही त्याला टेस्ट टीममध्ये कायम ठेवलय. पण त्याला उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलय. केएल राहुलला उपकर्णधार पदावरुन कोणी हटवलं? हा प्रश्न आहे. हा निर्णय सिलेक्टर्सनी घेतला? की टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने?

राहुलला हटवण्याचा निर्णय कोणी घेतला?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिलेक्टर्सनी केएल राहुलला उपकर्णधारपदावरुन हटवलेलं नाही. हे काम रोहित शर्माने केलय. बातम्यांनुसार, सिलेक्टर्सनी रोहित शर्माला निर्णय घेण्याच स्वातंत्र्य दिलं होतं. रोहितने कुठल्याच प्लेयरला तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी उपकर्णधार बनवलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “टीममध्ये कोणीच उपकर्णधार नसेल हा निर्णय घेण्यात आला. रोहितच्या अनुपस्थितीत कोण नेतृत्व करेल? ते ठरवण्याचा अधिकार रोहितला देण्यात आला”

रोहितने राहुलचा बचाव केला, पण….

दिल्लीमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माने केएल राहुलचा बचाव केला. “एखाद्या खेळाडूमध्ये टॅलेंट असेल, तर त्याला संधी मिळेल. हे फक्त केएल राहुल बाबतच नाही, तर प्रत्येक खेळाडूसाठी आहे. आम्ही कुठल्या एका खेळाडूचं प्रदर्शन पाहणार नाही. आम्ही संपूर्ण टीमच प्रदर्शन पाहतो” असं रोहित शर्मा म्हणाला. दिल्ली जिंकल्यानंतर संध्याकाळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटच्या दोन कसोटी आणि वनडे सीरीजसाठी टीम जाहीर झाली, तेव्हा केएल राहुलच डिमोशन झालेलं होतं. कधी त्याच्याकडे कॅप्टन म्हणून पाहिलं जात होतं

केएल राहुल मागच्या काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय. त्याला वनडे फॉर्मेटमध्येही उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलय. त्याच्याजागी हार्दिक पंड्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलीय. केएल राहुलकडे टी 20 आणि वनडे टीमचा कॅप्टन म्हणून पाहिलं जात होतं. पण हार्दिक पंड्याने त्याची जागा घेतली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.