AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians : एकदम कडक, रोहितच्या टीममध्ये नवीन ‘हिटमॅन’, थेट छपरावर पोहोचवला SIX, Video

Mumbai Indians ची टीम हरली, पण या नव्या हिटमॅनने सर्वांनाच जिंकलं. मुंबई इंडियन्सने त्याला फक्त 20 लाख रुपयात विकत घेतलय. एका इनिंगमध्ये 578 धावा ठोकल्या होत्या. त्याने 42 फोर आणि 37 सिक्स मारले होते.

Mumbai Indians : एकदम कडक, रोहितच्या टीममध्ये नवीन 'हिटमॅन', थेट छपरावर पोहोचवला SIX, Video
nehal wadheraImage Credit source: PTI
| Updated on: Apr 03, 2023 | 3:06 PM
Share

MI vs RCB IPL 2023 : मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला विजयी सुरुवात करता आली नाही. पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबई इंडियन्सचा 8 विकेटने पराभव केला. मुंबईने मॅच गमावली. पण नेहल वाधेरा एक सिक्स मारुन रातोरात स्टार बनला. हा नुसता सिक्स नव्हता, तर लक्षात राहण्यासारखा सिक्स होता. मुंबईने 48 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी नेहल क्रीजवर आला. त्यावेळी तिलक वर्मा आणि डेब्यु करणाऱ्या नेहलने मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला.

तिलक 84 रन्सवर नाबाद राहिला. नेहलने 13 चेंडूत 21 धावा फटकावल्या. तिलक आणि नेहलच्या तुफानी बॅटिंगच्या बळावर मुंबईने 7 विकेट गमावून 171 धावा केल्या. RCB ने हे लक्ष्य 16.2 ओव्हर्समध्ये गाठलं. नेहलची इनिंग छोटी होती. पण पदार्पणातच त्याने लक्ष वेधून घेतलं.

101 मीटर लांब सिक्स

नेहलने आपल्या आक्रमक खेळीत एक चौकार आणि दोन षटकार मारले. त्याने कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर एक असा सिक्स मारला, ज्याने पाहणारे थक्क झाले. 14 वी ओव्हर सुरु होती. कर्णच्या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर नेहलने लॉन्ग ऑनच्या वरुन 101 मीटर लांब सिक्स मारला. नेहलने चेंडूला थेट स्टेडियमच्या छपरावर पोहोचवलं. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये 100 मीटर लांब सिक्स मारणारा नेहल पहिला भारतीय बनलाय.

ऑक्शननंतर सीनियर लेव्हलला डेब्यु

22 वर्षाच्या नेहलला मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसला विकत घेतलय. वैशिष्ट्य म्हणजे मुंबईने नेहलला विकत घेतलं, तेव्हा त्याने एकही टी 20 सामना खेळला नव्हता. त्याने सीनियर लेव्हलला सुद्धा एकही मॅच खेळली नव्हती. मुंबईने विकत घेतल्यानंतर त्याने यावर्षी जानेवारी महिन्यात रणजीमध्ये डेब्यु केला. आरसीबी विरुद्ध त्याचा हा फक्त पहिला आयपीएल सामना नाही, तर करियरलमधला पहिला टी 20 सामना होता. एका इनिंगमध्ये 79 फोर-सिक्स

नेहलची क्षमता आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दिसून आली. पण हे फार कमी जणांना माहितीय, तो मोठ्या इनिंगही खेळू शकतो. वर्षभरापूर्वी पंजाबच्या अंडर 23 इंटर डिस्ट्रिक टूर्नामेंटमध्ये भटिंडा विरुद्ध एका इनिंगमध्ये 578 धावा ठोकल्या होत्या. लुधियानाकडून खेळताना त्याने 42 फोर आणि 37 सिक्स मारले होते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.