Rohit Sharma : रोहित शर्माला कोरोना, टीम इंडियाचा कर्णधार कोण? या दोन खेळाडूंमध्ये टक्कर

कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी घेतली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो सध्या टीम हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माला कोरोना, टीम इंडियाचा कर्णधार कोण? या दोन खेळाडूंमध्ये टक्कर
टीम इंडियाचा कर्णधार कोण असणार?Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 1:48 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज पहाटे क्रिकेट (Cricket) चाहत्यांना एक वाईट बातमी दिली. भारतीय संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार रोहित शर्मा 1 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कोरोनाबाधित आढळला आहे. रोहित रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) मध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर RT-PCR आज होणार आहे. सध्या तो उपचार घेत आहे. अशा परिस्थितीत भारतासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की तो कसोटी सामन्यापूर्वी तंदुरुस्त होऊ शकेल की नाही? तो फिट नसेल तर टीम इंडियाचा कर्णधार कोण? रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर रोहितच्या अनुपस्थितीत,असे दोन खेळाडू आहेत,ज्यांना कर्णधारपदाची संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्यापैकी एकाला बीसीसीआयकडून संघाची कमान दिली जाऊ शकते. अशा स्थितीत संघातील वरिष्ठ खेळाडू विराट कोहलीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

बीसीसीआयची माहिती

कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी घेतली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो सध्या टीम हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे.

हे सुद्धा वाचा

RT-PCR चाचणीचा रिपोर्ट कधी?

लीसेस्टरशायरविरुद्ध सुरू असलेल्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहितने फलंदाजी केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी तो मैदानात उतरला नाही. दुसऱ्या भारतीय डावात त्याने फलंदाजी केली नाही. 35 वर्षीय भारतीय कर्णधाराने कसोटी सामन्यात शुभमन गिलसह डावाची सुरुवात करणे अपेक्षित आहे आणि त्याचा सहभाग आता त्याच्या RT-PCR चाचणीचा रिपोर्टवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता या रिपोर्टची प्रतीक्षा सर्वांना आहे.

ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन देखील उशिरा इंग्लंडमध्ये संघात सामील झाला. कारण संघ यूके दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याची देखील कोरोना चाची झाली. मात्र, यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ही आलाय. यूकेमध्ये आता बायो-बबलच्या खाली सामने खेळले जात नाहीत. भारताने नुकतेच बायो-बबलशिवाय दक्षिण आफ्रिकेचेही यजमानपद भूषवले आहे. त्यामुळे आता रोहितचं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, यावर बरंच काही अवलंबून असणार आहे,

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.