AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? ऑस्ट्रेलिया की दक्षिण अफ्रिका! दिग्गज क्रिकेटपटूंनी वर्तवलं असं भाकीत

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. या स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूंनी भाकीत वर्तवून मोकळे झाले आहेत.

WTC 2025 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? ऑस्ट्रेलिया की दक्षिण अफ्रिका! दिग्गज क्रिकेटपटूंनी वर्तवलं असं भाकीत
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 07, 2025 | 5:51 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनपासून सुरू होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदाही जेतेपदासाठी फेवरेट मानले जात आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेला कमकुवत समजून चालणार नाही. मागच्या वर्षात दक्षिण अफ्रिकेने कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टायटल डिफेंट करण्यासाठी मैदानात उतरेल. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा 209 धावांनी पराभव केला होता. तर दक्षिण अफ्रिकेने पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असदाना दोन्ही संघाच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी एक भविष्यवाणी वर्तवली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडी आणि दक्षिण माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने भाकीत वर्तवलं आहे.

काय म्हणाला एबी डीव्हिलियर्स?

दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्स म्हणाला की, ‘लॉर्ड्सवरील अंतिम सामना हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी एक मोठा क्षण आहे. संपूर्ण देश आमच्या संघाच्या समर्थनात असेल आणि आशा आहे की आम्ही यावेळी विजयाची रेषा ओलांडू शकू.’ दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ समोर असला तरी आम्ही काही घाबरत नाही असंही त्याने सांगितलं. ‘मी आव्हानासाठी उत्साहित आहे. हा एक संतुलित संघ आहे आणि मला विश्वास आहे की आपण ऑस्ट्रेलियाला हरवू शकतो. मी हे सर्व सांगत आहे कारण या अंतिम सामन्यासाठी फेवरेट आहेत.’

काय म्हणाला टॉम मूडी?

माजी क्रिकेटपटू टॉम मूडीने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “ऑस्ट्रेलियाने मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवून आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. आयसीसी स्पर्धांचा विचार केला तर, एक संघ म्हणून ऑस्ट्रेलियाची कामगिरी खूप उंचावते.” असं सांगताना ऑस्ट्रेलिया दबावात चांगली कामगिरी करते हे सांगण्यास विसरला नाही. “संघातील अनेक खेळाडूंनी अनेक मोठ्या आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत आणि जुन्या पिढीच्या कामगिरी पाहून ते मोठे झाले आहेत. ही विजयी मानसिकता त्यांच्यात आहे. माझ्या मते, ऑस्ट्रेलियाला निश्चितच थोडा फायदा होईल.” असं टॉम मूडी पुढे म्हणाला.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.