काहीच फरक पडला नसता…! बुमराहची श्रीलंका कसोटी मालिकेसाठी झालेली निवड अश्विनला खटकली
भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या मालिकेवर भारताचं गणित अवलंबून आहे. असं असताना जसप्रीत बुमराहची संघात झालेली निवड आर अश्विनला खटकली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 स्पर्धेतील महत्त्वाच्या असलेल्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून मालिकेत जय पराजयावर विजयी टक्केवारी अवलंबून आहे. 15 ऑगस्टला भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. पण या संघात जसप्रीत बुमराहचा नाव पाहून आर अश्विनचा संताप झाला आहे. त्याने या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आर अश्विनच्या मते, श्रीलंका दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराहची झालेली निवड चुकीची आहे. या दौऱ्यासाठी त्याची संघ निवड होईल हे अपेक्षित नव्हतं, असं आर अश्विन म्हणाला. त्याच्या मते, श्रीलंकेतील खेळपट्टा फिरकीला मदत करणाऱ्या आहेत. अशा स्थितीत बुमराहची भूमिक कमी असणार आहे. त्यामुळे वर्कलोड मॅनेज करण्यासाठी बुमराहला श्रीलंका कसोटी मालिकेतून वगळलं पाहीजे होतं.
संघातून बुमराहला वगळण्याचं कारण सांगत अश्विन म्हणाला…
आर अश्विनने एश की बात युट्यूब चॅनेलवर आपलं म्हणणं मांडलं आणि म्हणाला की, ‘बुमराह श्रीलंका मालिकेत खेळला नसता तर फार काही फरक पडला नसता. आपल्याला वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी बुमराहची खूपच गरज आहे. बुमराहल महत्त्वाच्या वनडे आणि कसोटी सामन्यात उतरवलं पाहीजे. येणाऱ्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत त्याला दोन कसोटी सामन्यात आराम दिला पाहीजे. न्यूझीलंड दौऱ्यात त्याला कसोटी मालिकेत संधी दिली जाऊ शकते. कारण तिथली खेळपट्टी त्याच्या गोलंदाजीला अनुकूल आहे.’
JASPRIT BUMRAH CAN SKIP THE SRILANKA TEST SERIES to MANAGE WORKLOAD : R. ASHWIN
[🔴]🎙️ Ravichandran Ashwin says, Bumrah skipping Srilanka series wouldn’t do big impact because pitches there are spin friendly & we need Bumrah for 2027 World Cup next year.
🎙️ So he should try… pic.twitter.com/hzESPKfN7T
— TheFakeFakeer (@TheFakeFakeer) July 28, 2026
बुमराहला एकच कसोटी खेळण्याची संधी मिळणार
श्रीलंका दौऱ्यात जसप्रीत बुमराहला फक्त एकाच कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड केली आहे. पण बीसीसीआयच्या मते त्याच्या फिटनेसच्या हिशेबाने मैदानात उतरेल. त्यामुळे पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहचं खेळणं कठीण आहे. त्याच्या जागी गुरनूर ब्रारला कसोटीत पदार्पणाची संधी जाण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये चार वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमराहला आराम दिला जाण्याची शक्यता अधिक आहे. यात प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाज आहेत.