AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | रिंकू सिंह आणि यशस्वी जयस्वाल युवा खेळाडूंना लॉटरी!

Indian Cricket Team | आयपीएल 16 वा मोसम गाजवलेल्या युवा आणि प्रतिभावान यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंह या दोघांना मोठी लॉटरी लागली आहे.

Team India | रिंकू सिंह आणि  यशस्वी जयस्वाल युवा खेळाडूंना लॉटरी!
| Updated on: Jun 12, 2023 | 6:38 PM
Share

मुंबई | क्रिकेट टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला ऑलआऊट 234 धावाच करता आल्या. अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया आयसीसी प्रत्येक ट्रॉफी जिंकणारी पहिली टीम ठरली. तर टीम इंडियाचं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. आयपीएल आणि wtc final नंतर टीम इंडियाचे खेळाडू वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

वेस्टइंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या विंडिज दौऱ्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या विडिंज दौऱ्यानिमित्ताने 2 युवा खेळाडूंची टीम इंडियात निवड होण्याची दाट शक्यता आहे.

यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंह या दोघांना विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी संधी दिली जाऊ शकते. यशस्वी आणि रिंकू या दोघांनीही आयपीएल 16 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. आयपीएल 16 व्या मोसमात यशस्वीने राजस्थान रॉयल्स आणि रिंकू सिंह याने कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व केलं.

यशस्वी तर ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत होता. तर दुसऱ्या बाजूला रिंकूने तर गुजरात विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमधील शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. रिंकू आयपीएलच्या 16 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून एकूण 14 सामने खेळला. रिंकूने या सामन्यात 4 अर्धशतकांच्या मदतीने 474 धावांची खेळी केली. रिंकूची दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सेंट्रल झोनटीममध्ये निवड करण्यात आली आहे.

तर यशस्वी जयस्वाल याचा टीम इंडियात ऑस्ट्रिलया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऋतुराज गायकवाड याच्या जागी राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. यशस्वीने आयपीएल 16 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 625 धावा ठोकल्या. एकूणच काय, तर रिंकू आणि यशस्वी या दोघांनीही यशस्वीपणे आपली छाप सोडली आहे. त्यामुळे आता या दोघांवर निवड किती विश्वास दाखवते, हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.

टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका

पहिला सामना – 12 ते 16 जुलै

दुसरा सामना – 20-24 जुलै

वनडे सीरिज

पहिला सामना – 27 जुलै

दुसरा सामना 29 जुलै

तिसरा सामना 1 ऑगस्ट

टी 20 सीरिज

पहिला सामना – 4 ऑगस्ट

दुसरा सामना – 6 ऑगस्ट

तिसरा सामना – 8 ऑगस्ट

चौथ्या सामना – 12 ऑगस्ट

पाचवा सामना – 13 ऑगस्ट

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.