वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या युथ कसोटीत खेळणार नाही? झालं असं की…
Vaibhav Suryavanshi, IND U19 vs AUS U19: अंडर 19 क्रिकेटमध्ये सध्या वैभव सूर्यवंशीची चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या युथ टेस्टमध्ये त्याने झंझावाती शतक ठोकलं. पण आता दुसऱ्या युथ टेस्टमध्ये वैभव सूर्यवंशी नसण्याची शक्यता आहे. त्याचं कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

युथ कसोटी मालिकेसाठी भारताचा 19 वर्षाखालील संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून पहिला कसोटी सामना भारताने जिंकला. या कसोटी सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा झंझावात पाहायला मिळाला. या सामन्यात त्याने शतकी खेळी केली. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. पण दुसर्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करणार की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरणार यात काही शंका नाही. पण चांगली कामगिरी करू शकेल की नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे. कारण मागची आकडेवारी पाहता असंच म्हणावं लागेल. मल्टी डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्द मल्टी डे मालिका खेळल्या आहेत. आता तिसरी मालिका खेळत आहे. मागच्या दोन मालिकेतील पहिल्या दुसऱ्या सामन्यांची आकडेवारी बरंच काही सांगून जाते. वैभव सूर्यवंशी आतापर्यंत पाच मल्टी डे कसोटी सामने खेळला आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 आणि इंग्लंडविरुद्ध 2 सामने आहेत. यात त्याने 2 शतकांसह 311 धावा केल्या असून त्याची सरासरी 38.87 आहे. तीन मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी दमदार राहिली आहे. वैभव सूर्यवंशीने 57.60 च्या सरासरीने 288 धावा केल्या. पण मालिकेच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये त्याने 7.66 च्या खराब सरासरीने फक्त 23 धावा केल्या आहे.
वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेट कारकिर्दीतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा पुढचा सामना हा सहावा असेल. म्हणजेच मालिकेतील दुसरा सामना आहे. यात वैभव सूर्यवंशी परफॉर्म करेल की नाही याबाबत क्रीडाप्रेमींच्या मनात धाकधूक आहे. कारण मागच्या दोन मालिकांमधील दुसर्या सामन्यात त्याची बॅट काही चालली नाही. आता तसंच होईल की नाही माहिती नाही. पण आकडेवारीमुळे क्रीडारसिकांच्या मनात धाकधूक आहे. पण क्रिकेटच्या मैदानात आकडेवारीपेक्षा फॉर्म महत्त्वाचा असतो. वैभव सूर्यवंशी सध्या फॉर्मात आहे आणि तो ही आकडेवारी मोडून काढेल असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे.
