WIND vs WENG 1st T20I | डॅनियल व्याट-नॅट सायव्हर ब्रंट जोडीचा झंझावात, टीम इंडियाला 198 धावांचं आव्हान

WIND vs WENG 1st T20I | डॅनियल व्याट आणि नॅट सायव्हर ब्रंट या जोडीने टीम इंडियाच्या गोलंदाजांची तुडवणूक करत जोरदार फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडियासमोर 198 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

WIND vs WENG 1st T20I | डॅनियल व्याट-नॅट सायव्हर ब्रंट जोडीचा झंझावात, टीम इंडियाला 198 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 9:01 PM

मुंबई | वूमन्स क्रिकेट इंग्लंड टीमने भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या टी 20 सामन्यात विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं आहे. वूमन्स इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 197 धावा केल्या. डॅनियल व्याट आणि नॅट सायव्हर ब्रंट या जोडीने केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडला 180 पार मजल मारता आली. इंग्लंडकडून नॅट सायव्हर ब्रंट हीने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. तर डॅनियल व्याट हीने 75 रन्स केल्या. तर टीम इंडियाकडून रेणूका ठाकूर सिंह हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

इंग्लंडची बॅटिंग

टीम इंडियाने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंग्लंडकडून डॅनियल व्याट आणि सोफिया डंकले सलामी जोडी मैदानात आली. रेणूका सिंह हीने इंग्लंडला पहिल्याच ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूत सलग 2 झटके देत टीम इंडियाला शानदार सुरुवात करुन दिली. रेणूकाने डंकलेला 1 आणि अॅलिस कॅप्सी हीला झिरोवर आऊट केलं. त्यामुळे इंग्लंडची 2-2 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर नॅट सायव्हर ब्रंट आणि डॅनियल व्याट या दोघींनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची निर्णायक भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. मात्र साइका इशाक हीने पदार्पणातील सामन्यात डॅनियल व्याट हीला 75 धावांवर आऊट केलं. त्यानंतर इंग्लंडने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या विकेटसाठी अनुक्रमे 25, 12 आणि 20 धावांची भागीदारी केली.

नॅट सायव्हर ब्रंट हीने 53 बॉलमध्ये 77 धावा केल्या. कॅप्टन हेदर नाईट 6 धावा करुन बाद झाली. विकेटकीपर एमी जोन्स हीने 9 बॉलमध्ये 23 धावांची खेळी करुन फिनिशिंग टच दिला. तर फ्रेया केम्प 5 धावांवर नाबाद परतली. टीम इंडियाकडून रेणूका सिंह हीच्याशिवाय डेब्युटंट श्रेयंका पाटील हीने 2 विकेट्स घेतल्या. तर साइका ईशाक हीच्या खात्यात 1 विकेट गेली.

वूमन्स टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयांका पाटील, कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग आणि सायका इशाक.

वूमन्स इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | हेदर नाइट (कर्णधार), डॅनियल व्याट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल आणि माहिका गौर.

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.