WIND vs WSA: टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, कोण जिंकणार?

India Women vs South Africa Women 2nd Odi Live Streaming: वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे.

WIND vs WSA: टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, कोण जिंकणार?
wind vs wsa odi seriesImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 11:09 PM

महिला दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय मालिका, एकमेव कसोटी आणि टी 20 मालिका होणार आहे. सध्या उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने मालिकेतील सलामीच्या सामन्यात 143 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडिया दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रंगत पाहायला मिळणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बुधवारी 19 जून रोजी होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 1 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर कुठे बघता येईल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना जिओ सिनेमा एपवर मोफत पाहायला मिळेल.

वूमन्स टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, प्रिया पुनिया, सायका इशाक आणि उमा चेत्री.

दक्षिण आफ्रिका वूमन्स टीम : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, ॲनेरी डेर्कसेन, नॉन्डुमिसो शांगासे, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, डेल्मी टकर, तुमी सेखुखुने, मिके डी रिडर, नादिन डी क्लर्क आणि एलिझ-मारी मार्क्स.

Non Stop LIVE Update
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात..
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात...
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.