AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIND vs WSA: मेन्सनंतर वूमन्स टीम इंडियाचाही धमाका, दक्षिण आफ्रिकेचा उडवला 10 विकेट्सने धुव्वा

India Women vs South Africa Women: भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर एकमेव टेस्ट मॅचमध्ये 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

WIND vs WSA: मेन्सनंतर वूमन्स टीम इंडियाचाही धमाका, दक्षिण आफ्रिकेचा उडवला 10 विकेट्सने धुव्वा
shafali verma wind vs wsa test
| Updated on: Jul 01, 2024 | 5:28 PM
Share

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत ट्रॉफीवर नाव कोरलं. मेन्सनंतर आता वूमन्स टीम इंडिया क्रिकेट टीमने धमाका केला आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकमेव कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे.या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. शफाली वर्मा आणि स्नेह राणा या दोघी टीम इंडियाच्या विजयाच्या नायिका ठरल्या.

स्नेह राणचा धमाका

वूमन्स टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेनंतर टेस्ट क्रिकेटमध्येही विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. वनडे सीरिजमध्ये 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप दिल्यानंतर टीम इंडियाने एकमेव कसोटी सामनाही जिंकलाय. स्नेह राणा हीने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून 10 विकेट्स घेतल्या. स्नेह राणा अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला ठरली. तसेच क्रिकेट विश्वातील दुसरी महिला गोलंदाज ठरली. स्नेहलला तिच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. शफाली वर्मा हीचं द्विशतक आणि स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिला डाव 6 बाद 603 धावांवर घोषित केला. त्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 266 धावांवर ऑलआऊट करत फॉलोऑन दिला. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 373 धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला फक्त 37 धावांचं माफक आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान एकही विकेट न गमावता सहज पूर्ण केलं.

टीम इंडियाचा 10 विकेट्सने विजय

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, शुभा सतीश, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका ठाकूर सिंग आणि राजेश्वरी गायकवाड.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), सुने लुस, अनेके बॉश, मारिझान कॅप, डेल्मी टकर, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको म्लाबा आणि तुमी सेखुखुने.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.