चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध जिंकणं वाटतं…, वसीम जाफरने असं मांडलं गणित
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहे. याच स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं पारडं जड आहे. मात्र अशी चूक करणं टीम इंडियाला महागात पडू शकतं. नेमकं काय कारण ते जाणून घ्या.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. दोन्ही संघ तूल्यबळ असून कोण जेतेपदावर नाव कोरणार हे सांगणं कठीण आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात भारताने न्यूझीलंडचा साखळी फेरीत धुव्वा उडवला आहे. 44 धावांनी भारताने विजय मिळवला होता. पण प्रत्येकवेळी असं होईलच असं नाही. त्यामुळे टीम इंडियाला गाफिल राहून चालणार नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने याबाबत टीम इंडियाला अंतिम सामन्यापूर्वीच सावध केलं आहे. जाफरच्या मते, न्यूझीलंडचा संघ भारताविरूद्ध खेळला आहे. यावेळेस त्यांनी जोरदार तयारी केली असणार यात काही शंका नाही. न्यूझीलंडची गोलंदाजी भक्कम असून फिरकीपटूंचे पर्याय आहेत. न्यूझीलंड संघात फिरकीसाठी मिचेल सँटनर आणि मायकल ब्रेसवेल यांच्या व्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र हे देखील गोलंदाजीत योगदान देतात.
वसिम जाफरने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीच्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, भारताने यापूर्वी स्पर्धेत न्यूझीलंडला सहज हरवलं आहे. पण अंतिम फेरीत इतकं सोपं नसेल. न्यूझीलंड या सामन्यात पूर्ण तायरीनिशी उतरेल. त्यांना दुबईच्या वातावरणाबाबत माहिती झालं आहे. कारण न्यूझीलंडचा संघ एक सामना खेळला आहे. दुसरीकडे त्यांच्याकडे फलंदाजी तळापर्यंत होते. तसेच गोलंदाजीतही उजवी बाजू आहे. मिचेल सँटनर चांगलं कर्णधारपद भूषवित आहे, तसेच गोलंदाजीतही कामगिरी करत आहे. संघात मायकल ब्रेसवेल, ग्लेन फिलिपस्त आणि रचिन रविंद्र आहे. त्यामुळे गोलंदाजीत चांगले पर्याय आहेत. हे पर्याय इतर संघांकडे नव्हते.
दोन्ही संघांचे खेळाडू
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार) , शुबमन गिल , विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल , ऋषभ पंत , हार्दिक पंड्या , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , कुलदीप यादव , मोहम्मद शमी , अर्शदीप सिंग , हर्षित राणा.
न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार) , मायकल ब्रेसवेल , मार्क चॅपमन , डेव्हॉन कॉनवे , मॅट हेन्री , टॉम लॅथम , डॅरिल मिचेल , विल्यम ओरोर्क , ग्लेन फिलिप्स , रचिन रवींद्र , नाथन स्मिथ , केन विल्यमसन , विल यंग , जेकब डफी , काइल जेमिसन.
