न्यूझीलंडकडे 9 मार्चला विजेता होण्याच्या दोन संधी, कसं काय ते जाणून घ्या
न्यूझीलंड क्रिकेट संघाकडे 9 मार्चला दोनदा विजेता होण्याची नामी संधी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. दुसरीकडे, आपल्याच देशात वनडे क्रिकेटमध्ये आपली पकड मजबूत करण्याची संधी आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्चला होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. 9 मार्च हा न्यूझीलंड क्रिकेटसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण या दिवशी एक नाही तर दोनदा विजेता बनण्याची संधी न्यूझीलंडकडे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडचा सामना तर भारताशी होणार आहे. मग त्यांच्याकडे दोन वेळा विजेता बनण्याची संधी कशी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरं आहे. कारण न्यूझीलंड क्रिकेट संघ एक नाही तर दोन ठिकाणी खेळणार आहे. न्यूझीलंड 9 मार्चला दोन ठिकणी वनडे सामने खेळणार आहे.
9 मार्चला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जेतेपदाशी लढत होणार आहे. तर दुसरीकडे, न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ वनडे मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबईत होणार आहे. न्यूझीलंडचा महिला क्रिकेट संघ वनडे मालिकेत शेवटचा आणि निर्णायक सामना श्रीलंकेविरुद्ध होम ग्राउंडवर खेळणार आहे. श्रीलंकेचा महिला संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. यात तीन वनडे आणि तीन टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. सध्या वनडे मालिका सुरु आहे. पहिला सामना अनिर्णित ठरला. दुसरा सामना 7 मार्चला होत आहे. तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 9 मार्चला होणार आहे. त्यामुळे महिला क्रिकेट संघाकडेही मालिका विजयाची संधी आहे.
न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा धडक मारली आहे. तसेच 2000 सालानंतर दुसऱ्यांदा जेतेपदाची संधी आहे. यापूर्वी आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने भारताला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडे दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडे एकाच दिवशी दोन आनंदाच्या बातम्या देण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे आता संधीचं सोनं होतं की माती ते 9 मार्चला स्पष्ट होईल. दुसरीकडे, भारतीय संघही तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे.
