Team India : टीम इंडिया 15 डिसेंबरपासून टी 20i सीरिज खेळणार, पाहा वेळापत्रक

T20i Series Schedule India Women Cricket Team : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेली टीम इंडियाची महिला ब्रिगेड 15 डिसेंबरपासून मायदेशात टी 20i सीरिज खेळणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

Team India : टीम इंडिया 15 डिसेंबरपासून टी 20i सीरिज खेळणार, पाहा वेळापत्रक
bcci logo
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 7:38 PM

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वूमन्स इंडिया क्रिकेट टीमने एकदिवसीय मालिका गमावली आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडिया या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 11 डिसेंबरला होणार आहे. टीम इंडियासमोर हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड करण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया पाहुण्या टीम इंडियाला पराभूत करण्यासह 3-0 ने क्लिन स्वीप करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.त्यामुळे या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

वूमन्स टीम इंडिया या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात टी 20i मालिका खेळणार आहे.  टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यात या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी पाहुण्या संघाने काही दिवसांपूर्वीच संघ जाहीर केला आहे. मात्र मालिकेला अवघे काही तास शिल्लक असूनही भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवड समिती या मालिकेसाठी भारतीय संघाची केव्हा घोषणा करते? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

3 सामने 1 मैदान

मालिकेतील तिन्ही सामने हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पर्यायाने दोन्ही संघांना सरावासाठी अधिक वेळ देता येणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 15 डिसेंबरला होणार आहे.

विंडिज संघाची काही दिवसांआधीच घोषणा

टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 15 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई

दुसरा सामना, 17 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई

तिसरा सामना, 19 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई

टी 20i सीरिजसाठी विंडिज टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उप-कर्णधार), आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, शबिका गजनबी, रशादा विल्यम्स, चिनेल हेन्री, झैदा जेम्स, कियाना मॅन जोसेफ, अश्मिनी मुनिसार आणि करिश्मा रामहरक .

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.