Womens T20 WC 2024 : न्यूझीलंडचं दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमवून 158 धावा केल्या आणि विजयासाठी 159 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील विजेत्या संघाचा फैसला आता थोड्याच वेळात होईल. दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन संघ जेतेपदासाठी आमनेसामने आहेत. या सामन्यातील पहिला डाव संपला असून न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीतही दक्षिण अफ्रिकेने यशस्वीरित्या धावांचा पाठलाग केला होता. आता न्यूझीलंडने दिलेलं 159 धावांचं आव्हान दक्षिण अफ्रिका गाठणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही जेतेपद जिंकलेलं नाही. त्यामुळे दोन्ही संघांचं पहिल्या जेतेपदासाठी स्वप्न आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात दोन्ही संघ जेतेपदासाठी जोर लावणार यात शंका नाही. आता नशिबाचं दार कोणासाठी उघडतं आणि कोण जेतेपद जिंकणार याची उत्सुकता लागून आहे.
न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्ये जबरदस्त खेळी केली. 7 षटकात 1 गडी गमवून 50 धावा केल्या. जॉर्जिया प्लिमरच्या रुपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. तिने दोन चौकार मारले आणि एकूण 9 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी चांगली भागीदारी केली. तसेच डाव सावरला. सुझी बेट्स 31 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 32 धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली सोफी डिव्हाईन काही खास करू शकली नाही. अमेलिया केल आणि ब्रूक हालिडे यांनी चांगली खेळी केली. अमेलियाने 43, तर ब्रूकने 38 धावा केल्या.
वुमन्स आणि मेन्स क्रिकेट संघात तिसऱ्यांदा असा योगायोग जुळून आला आहे. ऑस्ट्रेलिया मेन्स वुमन्स संघ 2012 टी20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. वेस्ट इंडिजनने तेव्हा मेन्स संघाला पराभूत केलं होतं. तर ऑस्ट्रेलिया वुमन्स संघाने जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये वेस्ट इंडिजचा मेन्स वुमन्स संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेच्या मेन्स संघाने यंदाच्या टी20 फायनलमध्ये एन्ट्री मारली होती. पण भारताकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (डब्ल्यू), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास.
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिझान कॅप, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका