AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय भारतासाठी महत्त्वाचा, नाणेफेक जिंकताच…

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात महत्त्वाचा सामना होत आहे. या सामन्यातून उपांत्य फेरीतील दुसरा संघ ठरणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे भारताची नजर लागून आहे. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला तर भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे या जर तरच्या लढाईत कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून आहे.

PAK vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय भारतासाठी महत्त्वाचा, नाणेफेक जिंकताच...
| Updated on: Oct 14, 2024 | 7:13 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकता प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या सामन्यात काय होते याकडे लक्ष लागून आहे. तसं पाहिलं तर तिन्ही संघांना उपांत्य फेरीची संधी आहे. पण हा सामना न्यूझीलंडने जिंकला तर थेट उपांत्य फेरी गाठेल. पण हरला तर मात्र उपांत्य फेरीचं गणित नेट रनरेटवर ठरेल. पाकिस्तानचा संघ नेट रनरेटच्या बाबतीत फारच मागे आहे. त्यामुळे जिंकूनही पात्र होऊ शकणार नाही. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीचा संघ ठरणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना पाकिस्तान जिंकावा असंच वाटत आहे. पण पाकिस्तानची संपूर्ण स्पर्धेतील खेळी पाहता जिंकेल असं वाटत नाही. पण एखादा चमत्कार घडावा असा सामना झाला तर मात्र भारताला संधी मिळू शकते. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईनने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. भारताविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. हा नवा खेळ आणि नवा संघ आहे. फार पुढे जाता येत नाही. संघात एक बदल केला आहे. कॅस्परेक बाहेर केलं आहे. आम्हाला माहित आहे की हा सामना किती महत्त्वाचा आहे.’

फातिमा सनाने विजयाचा निर्धार केला आहे. उपांत्य फेरीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. ‘आम्ही नेट रनरेटनुसार खेळू. न्यूझीलंडविरुद्ध आमची मालिका चांगली होती. मी तुबाची जागा घेत आहे.’, असं फातिमा सानाने सांगितलं. न्यूझीलंडने या खेळपट्टीवर भारताविरुद्ध 160 धावा केल्या होत्या. आउटफिल्ड थोडे वाळूवर आधारित आहे. एक पाटा विकेट दिसत आहे. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होऊ शकते.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, सदफ शमास, निदा दार, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल.

न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास

वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान
वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान.
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा....
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा.....
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.