INDvsPAK | भारत-पाक चिर प्रतिद्ंवदी रविवारी भिडणार, कोण जिंकणार?

रविवारी 12 फेब्रुवारीला हायव्होल्टेज सामना होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात आमनेसामने असणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वाावरण आहेत. जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही.

INDvsPAK | भारत-पाक चिर प्रतिद्ंवदी रविवारी भिडणार, कोण जिंकणार?
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 10:08 PM

केपटाऊन : महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील हायव्होल्टेज आणि बहुप्रतिक्षित सामना हा रविवारी 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे. हा सामना होणार आहे तो 2 कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात. या सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यानिमित्ताने टी 20 सामन्यात आणि वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये उभयसंघात आतापर्यंत कोणाचा बोलबाला राहिला आहे, हे आपण आकड्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

आकडेवारी काय सांगते?

आतापर्यंत भारत-पाक यांच्यात 13 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 13 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला. तर फक्त 3 वेळा पाकिस्तानता विजय झालाय.

तर टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ एकूण 6 वेळा भिडले आहेत.इथेही भारताचा वरचष्मा राहिला आहे. भारताने 4 वेळा पाकिस्तानता धुव्वा उडवलाय. तर पाकिस्तानला 2 सामन्यात जिंकता आलं आहे. तर वनडे कपमधील चारही सामन्यात टीम इंडियानेच पाकिस्तानवर मात केलीय.

हे सुद्धा वाचा

महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झालीय. भारत-पाक यांचा 12 तारखेला वर्ल्ड कप मोहिमेतील पहिलाच सामना आहे. दोघेही कट्टर प्रतिस्पर्धी. वर्ल्ड कपपेक्षा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आणि तितकाच प्रतिष्ठेचा असतो. त्यामुळे दोन्ही संघांकडून हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न असणार आहे. मात्र कोणती टीम जिंकणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

स्मृती मंधाना ‘आऊट’

दरम्यान या महत्वाच्या सामन्याआधी टीम इंडियाला एक जबर धक्का बसला. सलामीची फलंदाज स्मृती मंधाना अंगठ्याच्या दुखापतीमुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाली. टीम इंडियाचे कोच ऋषिकेश कानिटकर यांनी याबाबतची माहिती दिली. स्मृती विंडिज विरुद्धच्या 15 फेब्रुवारीच्या सामन्याआधी फिट होईल, असंही कानिटकर यांनी सांगितलं.

भारतीय संघ – हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग आणि शिखा पांडे.

पाकिस्तानी संघ- अयेशा नसीम, जवेरिया खान, सदाफ शाम्स, सिद्रा अमीन, अलिया रियाझ, बिस्माह मरुफ (कर्णधार), फातिमा साना, निदा दार, ओमैमा सोहेल, मुनीबा अली, सिद्रा नवाज, एमन अनवर, डायना बैग, घुलाम फातिमा, कैनत इम्तियाझ, नाश्रा संधू, सादिया इकबाल आणि तुबा हस्सन.

शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.