AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : कसोटीत इंग्लंडचा विजय आणि श्रीलंकेसह पाकिस्तानला बसला धक्का, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उलथापालथ

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा 5 विकेटने धुव्वा उडवला. तसेच मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. इंग्लंडला फायदा तर श्रीलंका आणि पाकिस्तानला फटका बसला आहे.

WTC 2025 : कसोटीत इंग्लंडचा विजय आणि श्रीलंकेसह पाकिस्तानला बसला धक्का, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उलथापालथ
| Updated on: Aug 25, 2024 | 12:08 AM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याचा निकाल रविवारी लागणार आहे. पण इंग्लंडने श्रीलंकेला पराभूत केल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. या विजयासह इंग्लंडने थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर श्रीलंकेची पाचव्या आणि पाकिस्तानची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्याचा निकाल येण्यापूर्वीच पाकिस्तानला फटका बसला आहे. दुसरीकडे, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान जिंकेल अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या विजयी टक्केवारीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. सामना ड्रॉ झाला तरी पाकिस्तानला फटका बसणार हे निश्चित आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं पाकिस्तानचं गणित किचकट होईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारताने 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला असून विजयी टक्केवारी 68.52 इतकी आहे. तसेच गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 62.50 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर, न्यूझीलंड 50 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या, इंग्लंडने सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी विजयी टक्केवारी 36.54 होती. या विजयाने ही टक्केवारी 41.07 झाली आहे. तर श्रीलंकेची चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. 50 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर घसरण झाली आहे. तसेच दक्षिण अफ्रिकेची पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी 38.89 टक्के इतकी आहे. तर पाकिस्तान 36.66 विजयी टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे. त्या खालोखल बांगलादेश 25 विजयी टक्केवारीसह आठव्या, तर वेस्ट इंडिज 18.52 विजयी टक्केवारीसह नवव्या स्थानावर आहे.

WTC2025 (1)

पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्या डावात 236 धावा केल्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात 358 धावा करत 122 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात श्रीलंकेने कडवी झुंज दिली. 326 धावा केल्या पण 122 धावांची आघाडी वजा करता विजयासाठी 204 धावांचं मिळालं. हे आव्हान इंग्लंडने चौथ्या दिवशीच 5 गडी गमवून पूर्ण केलं. दुसरीकडे, पाकिस्तान बांगलादेश सामना ड्रॉ होण्याची दाट शक्यता आहे.

Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.