WTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज!

भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिलला डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये तंबूत धाडून टीम साऊथीने मोठा विक्रम केलाय. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात 600 बळींचा आकडा पूर्ण केलाय. (WTC Final 2021 tim Southee Second Nwe Zealand bowler Take 600 Wickets)

WTC Final 2021 : टीम साऊथीचा जलवा, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा केवळ दुसरा गोलंदाज!
टीम साऊथीचा 600 विकेट्सचा रेकॉर्ड..

साऊथहॅम्प्टन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) पावसाने घोळ घातलाय. अगदी दोन अडीज दिवस धुव्वाधार पाऊस पडल्याने प्रेक्षकांसहित खेळाडूंच्या आनंदावर विरजन पडलं. मात्र अंतिम सामन्याचा रोमांच तसूबरही कमी झाला नाही. दोन्ही संघांचा एक एक डाव पूर्ण झाला आहे. आज सहाव्या म्हणजेच अंतिम दिवशी खेळ होणार आहे. तत्पूर्वी किवींना नाममात्र 32 धावांचं लीड मिळालं आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिलला डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये तंबूत धाडून टीम साऊथीने (Tim Southee) मोठा विक्रम केलाय. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात 600 बळींचा आकडा पूर्ण केलाय. (World Test Championship Final 2021 tim Southee Second New Zealand bowler Take 600 Wickets)

साऊथीचा 600 विकेट्सचा टप्पा पूर्ण

144 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये साऊथॅम्प्टन्या मैदानावर खेळली जाणारी ही इतिहासातली पहिलीच कसोटी चॅम्पियनशीप फायनल आहे. अशा महत्त्वाच्या सामन्यात साऊथीने क्लास परफॉर्मन्स दिलाय. त्याने शुबमनची विकेट घेऊन 600 विकेट्सचा टप्पा पूर्ण केलाय. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा केवळ दुसरा बोलर ठरला आहे.

याअगोदर कुणाच्या नावावर अशी कामगिरी

याअगोदर न्यूझीलंडकडून डॅनियल व्हिटोरीने 600 विकेट्स घेतल्या होत्या. व्हिटोरीने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 696 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत तिसऱ्या नंबरवर आहेत सर रिटर्ड हेडली… त्यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत 589 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर ट्रेंट बोल्ट आहे, ज्याच्या नावावर 504 कसोटी विकेट आहेत.

न्यूझीलंडची सामन्यावर पकड, विराट-पुजाराच्या हाती भारताचं भविष्य!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) आज पाचव्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. भारतीय गोलंदाजांनी 249 धावात किवींचा संघ गारद केल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताची बिकट अवस्था झाली आहे. आतापर्यत भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 64 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारताला 32 धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी अद्याप मैदानात आहे.

तत्पूर्वी सलामीवीर कॉनवे याने 54 आणि कर्णधार केन विलियमसनने 49 धावांची खेळी करत न्यूझीलंडला 249 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने 76 धावात 4 बळी घेतले. तर त्याला इशांत शर्मा (3 बळी) आणि रवीचंद्रन अश्विन (2 बळी) यांनी चांगली साथ दिली. त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव 217 धावांमध्ये संपुष्टात आणला होता. त्यामुळे न्यूझीलंडला 32 धावांची आघाडी मिळाली होती.

(World Test Championship Final 2021 tim Southee Second Nwe Zealand bowler Take 600 Wickets)

हे ही वाचा :

India vs New Zealand Live, WTC Final 2021 5th Day : सामन्यावर किवींची मजबूत पकड, दुसऱ्या डावात भारताची 2 बाद 64 अशी अवस्था