India vs New Zealand Live, WTC Final 2021 5th Day : सामन्यावर किवींची मजबूत पकड, दुसऱ्या डावात भारताची 2 बाद 64 अशी अवस्था

| Updated on: Jun 23, 2021 | 12:23 AM

India vs New Zealand Live Score : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने फलंदाजीला सुरुवात केली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर आता पाचव्या दिवसाचा खेळ चार वाजता सुरु झाला असून पहिल्या सेशनच्या अखेरीस न्यूझीलंडची अवस्था 135 वर 5 बाद अशी होती.

India vs New Zealand Live, WTC Final 2021 5th Day : सामन्यावर किवींची मजबूत पकड, दुसऱ्या डावात भारताची 2 बाद 64 अशी अवस्था
WTC Final

India vs New Zealand WTC Final 2021 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) आज पाचव्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. भारतीय गोलंदाजांनी 249 धावात किवींचा संघ गारद केल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताची बिकट अवस्था झाली आहे. आतापर्यत भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 64 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारताला 32 धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी अद्याप मैदानात आहे. (India vs New Zealand live score WTC Final 2021 5th Day Match Scorecard online Southampton in marathi)

तत्पूर्वी सलामीवीर कॉनवे याने 54 आणि कर्णधार केन विलियमसनने 49 धावांची खेळी करत न्यूझीलंडला 249 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने 76 धावात 4 बळी घेतले. तर त्याला इशांत शर्मा (3 बळी) आणि रवीचंद्रन अश्विन (2 बळी) यांनी चांगली साथ दिली. त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव 217 धावांमध्ये संपुष्टात आणला होता. त्यामुळे न्यूझीलंडला 32 धावांची आघाडी मिळाली होती.

Key Events

केन विल्यमसनची एकाकी झुंज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसन एकाकी झुंज दिली. पहिला गडी बाद होताच फलंदाजीला आलेला केन 7 विकेट्सनंतरही क्रिजवर टिकून होता. विल्यमसनने तब्बल 177 चेंडूत 49 धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. इशांत शर्माने त्याला विराट कोहलीकरवी झेलबाद केलं.

सामना किवींच्या पारड्यात

कालपर्यंत पाऊस आणि अंधूक प्रकाशामुळे सामन्यात व्यत्यय येत होता. पावसामुळे दोन दिवसांचा खेळ रद्द करण्यात आला. त्यामुळे हा सामना ड्रॉ होईल असे वाटत होते. परंतु आता या सामन्यावर किवींनी मजबूत पकड मिळवली आहे. उद्या सहाव्या दिवशी (राखीव दिवस) भारताचे उरलेले 8 फलंदाज लवकर बाद करुन मिळेल ते टार्गेट पूर्ण करत सामना जिंकायचा मनसुबा न्यूझीलंडच्या संघाने आखलेला आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 22 Jun 2021 11:35 PM (IST)

    सामन्यावर किवींची मजबूत पकड, दुसऱ्या डावात भारताची 2 बाद 64 धावांपर्यंत मजल

    पाचव्या दिवसाचा खेळ संपला आहे. आतापर्यत भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 64 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारताला 32 धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी अद्याप मैदानात आहे.

  • 22 Jun 2021 11:16 PM (IST)

    भारताला दुसरा झटका, रोहित शर्मा 30 धावांवर बाद

    भारताने दुसरी विकेट गमावली आहे. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 30 धावांवर बाद झाला आहे. टीम साऊदीने त्याला पायचित पकडलं. (भारत 51/2)

  • 22 Jun 2021 11:15 PM (IST)

    भारताचं अर्धशतक पूर्ण, रोहित-पुजारा जोडी मैदानात

    24 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे दोघांनी धावफलकावर भारताचं अर्धशतक झळकावलं आहे.

  • 22 Jun 2021 10:16 PM (IST)

    भारताला पहिला झटका, सलामीवीर शुबमन गिल 8 धावांवर बाद

    दुसऱ्या डाव फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने खूप लवकर पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर शुबमन गिल अवघ्या 8 धावांवर बाद झाला. टीम साऊदीने त्याला पायचित पकडलं. (भारत 24/1)

  • 22 Jun 2021 09:20 PM (IST)

    भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, रोहित-शुबमन जोडी मैदानात

    भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली आहे.

  • 22 Jun 2021 08:54 PM (IST)

    न्यूझीलंडचा संघ 249 धावांत गारद, किवींना 32 धावांची नाममात्र आघाडी

    न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांत संपुष्टात आला आहे. टीम साऊदीच्या रुपाने त्यांनी अखेरची विकेट गमावली आहे. रवींद्र जाडेजाने त्याला त्रिफळाचित केलं. साऊदीने 46 चेंडूत 2 षटकारांसह 30 धावा केल्या.

  • 22 Jun 2021 08:43 PM (IST)

    न्यूझीलंडचा 9 वा गडी बाद, अश्विनकडून नील वॅगनरची शिकार

    न्यूझीलंडने 9 वी विकेट गमावली आहे. रविचंद्रन अश्विनने नील नील वॅगनर याला शून्यावर बाद केलं. रहाणेने त्याचा झेट टिपला. (न्यूझीलंड 236/9)

  • 22 Jun 2021 08:28 PM (IST)

    भारतीय गोलंदाजांना मोठं यश, केन विलियमसन 49 धावांवर बाद

    भारतीय गोलंदाजांना मोठं यश मिळालं आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला इशांत शर्माने 49 धावांवर बाद केलं आहे. विराट कोहलीने विलियमसनचा झेल टिपला. (न्यूझीलंड 221/8)

  • 22 Jun 2021 07:54 PM (IST)

    WTC Final : काईल जेमिसन बाद, न्यूझीलंडला सातवा झटका

    न्यूझीलंडच्या काईल जेमिसनने सामन्यातील पहिला षटकार खेचताच पुढच्याच बॉलवर शमीने जेमिसनला बाद केले आहे. जसप्रीत बुमराहने जेमिसनचा उत्कृष्ट झेल पकडला आहे.

  • 22 Jun 2021 07:53 PM (IST)

    काईले जेमिसनचा शानदार षटकार

    काईले जेमिनसनने या सामन्यातील पहिला षटकार ठोकला आहे. न्यूझीलंडच्या डावातील 87 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर जेमिसनने हा षटकार ठोकला. (न्यूझीलंड 192/7)

  • 22 Jun 2021 07:52 PM (IST)

    WTC Final 2021 : सामन्यातील पहिला षटकार

    न्यूझीलंडच्या काईल जेमिसनने सामन्यातील पहिला षटकार खेचला आहे. मोहम्मद शमीला जेमिसनने हा षटकार खेचला

  • 22 Jun 2021 07:50 PM (IST)

    WTC Final 2021 : केन विल्यमसनचा उत्कृष्ट चौकार

    न्यूझीलंडकडून एकाकी झुंज देत असलेल्या कर्णधार केन विल्यमसनने आणखी एक चौकार ठोकला आहे. शमी टाकत असलेल्या 87 व्या ओव्हरमध्ये केनने चौकार खेचला आहे.

  • 22 Jun 2021 07:25 PM (IST)

    WTC Final 2021 : न्यूझीलंडचा सहावा गडीत बाद

    न्यूझीलंडच्या संघाला आणखी एक झटका स्वींग किंग मोहम्मद शमीने दिला आहे. शमीने 83 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कॉलीन डी ग्रँडहोमला बाद करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं आहे.

  • 22 Jun 2021 07:16 PM (IST)

    WTC Final 2021 : न्यूझीलंडला एकाच ओव्हरमध्ये दोन चौकार

    81 व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननने दोन चौकार खेचले आहेत. मोहम्मद शमीला केनने हे दोन चौकार खेचले आहेत.

  • 22 Jun 2021 07:04 PM (IST)

    WTC Final 2021 : न्यूझीलंडच्या 150 धावा पूर्ण

    न्यूझीलंड संघाने 150 धावा पूर्ण केल्या आहेत.  78 ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोर 151 वर 5 बाद असा आहे.

  • 22 Jun 2021 06:45 PM (IST)

    WTC Final 2021 : कॉलीन डी ग्रँडहोमचा न्यूझीलंडकडून चौकार

    दुसऱ्या सेशनच्या पहिल्याच बॉलवर जसप्रीत बुमराहला कॉलीन डी ग्रँडहोमने चौकार खेचला आहे.

  • 22 Jun 2021 06:44 PM (IST)

    WTC Final 2021 : दुसऱ्या सेशनला सुरुवात, न्यूझीलंडचे फलंदाज मैदानात

    लंच ब्रेकनंतर दिवसाच्या दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अष्टपैलू खेळाडू कॉलीन डी ग्रँडहोमसोबत फलंदाजी करत आहे.

  • 22 Jun 2021 06:04 PM (IST)

    WTC Final 2021 : पहिलं सेशन संपलं, लंच ब्रेकसाठी खेळाडू तंबूत

    आजच्य दिवसाचं पहिलं सेशन संपलं असून न्यूझीलंडची अवस्था 135 वर 5 बाद झाली आहे. भारताचा सामन्यात दबदबा असल्याचं दिसून येत आहे.

  • 22 Jun 2021 05:55 PM (IST)

    WTC Final 2021 : शमीचा भेदक चेंडू आणि वॉटलिंग बाद

    भारताला आणखी एक यश मिळालं आहे. मोहम्मद शमीने अप्रतिम बॉल टाकत न्यूझीलंडच्या बीजे वॉटलिंगला बोल्ड करत तंबूत धाडलं आहे.

  • 22 Jun 2021 05:50 PM (IST)

    WTC Final 2021 : वा! इशांतला आणखी एक यश, न्यूझीलंडचा 4 चौथा गडी बाद

    इशांत शर्माला आणखी एक यश मिळालं आहे. भारताने न्यूझीलंडचा चौथा गडी तंबूत धाडला आहे. इशांतच्या बोलिंगवर रोहित शर्माने स्लिपमध्ये अप्रतिम कॅच पकडली आहे.

  • 22 Jun 2021 05:46 PM (IST)

    WTC Final 2021 : विल्यमसनचा उत्कृष्ट चौकार

    न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने जसप्रीत बुमराहला एक अप्रतिम चौकार खेचला.

  • 22 Jun 2021 05:16 PM (IST)

    WTC Final 2021 : भारताला तिसरं यश, शुभमनची अप्रतिम कॅच

    भारताला तिसरं य़श मिळालं आहे. मोहम्मद शमीच्या बॉलवर रॉस टेलरला शुभमन गिलने उत्कृष्ट कॅच घेत बाद केलं आहे.

  • 22 Jun 2021 04:56 PM (IST)

    WTC Final 2021 : झेल सुटला, चौकार गेला

    इशांत शर्माने टाकलेल्या 60 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रॉस टेलर आऊट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र यष्टीरक्षक ऋषभ पंतपासून चेंडू बराच दूर असल्याने तो कॅच पकडू शकला नाही आणि चौकार गेला.

  • 22 Jun 2021 04:39 PM (IST)

    WTC Final 2021 : न्यूझीलंडला दिवसाचा पहिला चौकार

    न्यूझीलंडच्या रॉस टेलरने 57 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीला चौकार ठोकत दिवसाचा पहिला चौका न्यूझीलंडला मिळवून दिला आहे.

  • 22 Jun 2021 04:25 PM (IST)

    WTC Final 2021 : इशांत-बुमराहची भेदक गोलंदाजी

    पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली असून भारताकडून जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा भेद गोलंदाजी करत आहेत. त्यांनी 5 ओव्हरमध्ये केवळ 3 धावा दिल्या आहेत.

  • 22 Jun 2021 04:00 PM (IST)

    WTC Final 2021 : सामन्याला सुरुवात न्यूझीलंडचे फलंदाज मैदानात

    बहुप्रतीक्षीत WTC Final च्या सामन्याला पुन्हा सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव सुरु असून केन विल्यमसन आणि रॉस टेलर फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत.

  • 22 Jun 2021 03:56 PM (IST)

    WTC Final 2021 : खुशखबर! सामना लवकरच सुरु होणार

    पाचव्या दिवशीच्या खेळाला लवकरत सुरुवात होणार असून बीसीसीआयने आजचे सेशन कसे असतील याचीही माहिती दिली आहे.

    पहिले सेशन- 4 – 6 PM (IST)

    दूसरे सेशन- 6.40 – 8.40 PM

    तिसरे सेशन – 9 – 11 PM

  • 22 Jun 2021 03:08 PM (IST)

    WTC Final 2021 : खेळ सुरु होण्यास विलंब

    पुन्हा एकदा WTC Final मध्ये पावासाने आडकाठी करण्यास सुरुवात केली आहे. ढग दाटून आल्यामुळे सामना सुरु होण्यास विलंब होणार आहे.

  • 22 Jun 2021 02:40 PM (IST)

    WTC Final 2021 : खेळाडूू मैदानात उतरले

    मैदानाचा अभ्यास करण्यासाठी खेळाडू मैदानात उतरले आहेत. एकदिवस संपूर्ण खेळपट्टीवर खेळ झाला नसल्याने खेळाडू मैदानाचा अंदाज घेत आहेत.

  • 22 Jun 2021 02:38 PM (IST)

    WTC Final 2021 : वातावरण साफ असल्याची बीसीसीआयची माहिती

    चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द झाला. मात्र पाचव्या दिवशी वातावरण साफ असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Published On - Jun 22,2021 2:35 PM

Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.