WPL 2024, MI vs UPW : सोलापूरच्या किरण नवगिरेसमोर मुंबई इंडियन्सची हवा गूल, युपी वॉरियर्सचा विजय

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा विजयी रथ रोखला. सलग दोन सामन्यात विजय मिळवलेल्या मुंबई इंडियन्सला 7 गडी राखून विजय मिळवला. युपी वॉरियर्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

WPL 2024, MI vs UPW : सोलापूरच्या किरण नवगिरेसमोर मुंबई इंडियन्सची हवा गूल, युपी वॉरियर्सचा विजय
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 10:37 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून युपी वॉरियर्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 गडी गमवून 161 धावा केल्या आणि विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं. तसं पाहिलं तर हे आव्हान मोठं होतं. पण सोलापूरच्या किरण नवगिरेच्या वादळापुढे मुंबईचं काहीच चाललं नाही. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 31 चेंडूत 57 धावांची वादळी खेळी केली. यामुळे युपी वॉरियर्सचा विजय सोपा झाला. किरण नवगिरेने 10 चेंडूवर षटकार आणि चौकार मारले. यातूनच 48 धावांची कमाई झाली. लेडी धोनी नावाने प्रसिद्ध असलेल्या किरण नवगिरेने आपल्याला मिळालेल्या नावावर साजेशी कामगिरी केली. या विजयासह युपी वॉरियर्सने स्पर्धेत विजयाचा नारळ फोडला आहे.

एलिसा हिली आणि किरण नवगिरे यांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. 10 च्या सरासरीने पहिल्या 9 षटकात धावसंख्या होती. त्यामुळे युपी वॉरियर्सचा विजय सोपा झाला. किरण नवगिरे बाद झाल्यानंतर तहिला मॅक्ग्राथ काही खास करू शकली नाही. 1 धाव करून तंबूत परतली, वोंगने तिला पायचीत केलं. त्यानंतर एलिसा हीली लगेचच बाद झाला. तिने 29 चेंडूत 33 धावा केल्या.

युपी वॉरियर्सकडून ग्रेस हॅरिस, अंजली सर्वानी, सोफी एक्सलस्टोन, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आता मुंबई इंडियन्सनच्या गोलंदाजांसमोर विजयासाठी दिलेलं आव्हान रोखण्याचं आव्हान आहे. आता मुंबई इंडियन्सचे गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, इस्सी वाँग, एस सजना, हुमैरा काझी, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.