बीसीसीआयच्या दणक्यानंतर इशान किशनचे तारे फिरले, मैदानात उतरला खरा पण..

गेल्या काही दिवसांपासून इशान किशन या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दक्षिण अफ्रिका दौरा सोडून मायदेशी परतल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. इशान किशनला रणजी ट्रॉफी खेळण्याची ताकीदही देण्यात आली. पण इशान किशनने याकडे कानाडोळा केला. आता त्याला त्याचा भूर्दंड भरावा लागला आहे. तसेच ज्या गोष्टीसाठी अट्टाहास केला त्यातही फ्लॉप ठरला आहे.

बीसीसीआयच्या दणक्यानंतर इशान किशनचे तारे फिरले, मैदानात उतरला खरा पण..
बीसीसीआयशी पंगा इशान किशनला पडला महागात, मोठा शहाणपणा करत बॅटींगला आला आणि...
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 7:44 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इशान किशन हे नाव बरंच चर्चेत आहे. युवा खेळाडूने बीसीसीआयच्या आदेशांना वारंवार केराची टोपली दाखवली. त्यामुळे त्याचे वर्तन पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सुद्धा टीम इंडियात पुनरागमनासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र इशान किशनने कोणाचंच ऐकलं नाही. तो थेट बरोड्यामध्ये वर्कआऊट करताना दिसला होता. त्यामुळे बीसीसीआयने थेट कारवाईचा बडगा उचलला आहे. सेंट्र्ल काँट्रॅक्टमधून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना वगळण्यात आलं आहे. श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीत उपांत्य फेरीत मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची तयारी दाखवली होती. मात्र इशान किशनकडून अशी कोणतंच पाऊल उचललं गेलं नाही. पण मुंबईत खेळल्या गेल्लाय टी20 कपसाठी आरबीआयकडून खेळत आहे. मात्र पहिल्याच सामन्यात सुपर फ्लॉप ठरला.

डीवाय युनिवर्सिटी मैदानात रुट मोबाइल लिमिटेड आणि आरबीआय यांच्यात लढत झाली. इशान किशनच्या संघाने हा सामना 89 धावांनी गमावला. या सामन्यात इशान किशनची कामगिरी सुमार राहिली. 12 चेंडूचा सामना केला आणि 19 धााव करून बाद झाला. विकेटच्या मागे चांगली किपिंग केली पण त्यातही हवा तसा दम दिसला नाही. रुट मोबाईल संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 192 धावा गेल्या. पण आरबीआयचा संघ 103 धावा करू शकला. 16.3 षटकात संपूर्ण संघ तंबूत होता.

इशान किशनला बीसीसीआयच्या सूचनाकडे कानाडोळा करणं महागात पडलं आहे. सेंट्रल काँट्रॅक्टमधून बाहेरचा दाखवला गेला आहे. यापूर्वी श्रेयस अय्यर बी आणि इशान किशन सी कॅटेगरीत होते. श्रेयस अय्यरला वार्षिक 3 कोटी आणि इशान किशनला 1 कोटी मिळत होते. मात्र आता त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. दुसरीकडे ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांचही नुकसान झालं आहे.

बीसीसीआयच्या काँट्रॅक्ट लिस्टमध्ये चार कॅटेगरी असतात. ए प्लसमध्ये असलेल्यांना वार्षिक 7 कोटी, ए कॅटेगरीत असलेल्यांना 5 कोटी, बी कॅटेगरीत असलेल्यांना 3 कोटी आणि सी कॅटेगरीत असलेल्यांना 1 कोटी रुपये मिळतात. ए प्लसमध्ये असलेले खेळाडू कसोटी, वनडे आणि टी20 मध्ये खेळतात.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.