AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2024, Point Table : गुजरात जायंट्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, युपी-बंगळुरुचं जर तरचं गणित

वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मध्यान्ह झाला आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ एकूण 4 सामने खेळला आहे. पुढे प्रत्येक संघाला आता प्रत्येकी 4 सामने खेळायचे आहेत. यावरून टॉप 3 मधील गणित स्पष्ट होणार आहे. असं असताना गुजरात जायंट्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

WPL 2024, Point Table : गुजरात जायंट्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, युपी-बंगळुरुचं जर तरचं गणित
WPL 2024, Point Table : गुजरात जायंट्सची स्पर्धेतील वाट बिकट, युपी-बंगळुरुची टॉप 3 साठी लागणार कसोटी
| Updated on: Mar 04, 2024 | 1:03 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ एकूण 8 सामने खेळणार आहे. त्यापैकी प्रत्येक संघाने 4 सामने खेळले आहेत. सध्याचं गुणतालिकेचं गणित पाहता गुजरात जायंट्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. चारपैकी एका सामन्यात पराभव झाला तर थेट बाहेरचा रस्ता असणार आहे. त्यामुळे गुजरात जायंट्सला पुढील चारही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. गुजरात जायंट्ससाठी स्पर्धेत करो या मरोची लढाई असणार आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत एकूण 5 संघ आहेत. तसेच साखळी फेरीत एकूण 20 सामने होणार असून प्रत्येक संघ 8 सामने खेळणार आहे. यापैकी टॉप 3 असलेल्या संघाची प्लेऑफमध्ये वर्णी लागेल. गुणतालिकेत 1 नंबरला असलेला संघ थेट अंतिम फेरी गाठेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांच्यात एक सामना खेळावा लागेल. प्लेऑफमधील सामना जिंकल्यानंतर अंतिम फेरीत गुणतालिकेत टॉपला असलेल्या संघाशी लढत होईल.

सध्याची गुणतालिका पाहता दिल्ली कॅपिटल्स 4 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दिल्लीचा नेट रनरेट +1.251 इतका आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ 4 पैकी 3 सामने जिंकला असून 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा कमी आहे. +0.402 मुंबईचा नेट रनरेट आहे. युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या खात्यात प्रत्येकी 4 गुण आहेत. युपीचा नेट रनरेट +0.211 आणि बंगळुरुचा नेट रनरेट -0.015 इतका आहे. त्यामुळे उर्वरित चार सामन्यात थोडी तरी गडबड झाली तर एकाचं आव्हान संपुष्टात येईल.

संघांचे नावसामनेविजयपराभवगुणनेट रनरेट
दिल्ली कॅपिटल्स4316+1.251
मुंबई इंडियन्स4316+0.402
युपी वॉरियर्स4224+0.211
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु4224-0.015
गुजरात जायंट्स4040-1.804

स्पर्धेतील उर्वरित सामने

  • युपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 4 मार्च 2024
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 5 मार्च 2024
  • गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 6 मार्च 2024
  • युपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 7 मार्च 2024
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध युपी वॉरियर्स, 8 मार्च 2024
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, 9 मार्च 2024
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 10 मार्च 2024
  • गुजरात जायंट्स विरुद्ध युपी वॉरियर्स, 11 मार्च 2024
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 12 मार्च 2024
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, 13 मार्च 2024
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.