AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि घेतला असा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग 11

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील दहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. दिल्लीने हा सामना जिंकला तर थेट टॉपला जाईल.

WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि घेतला असा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग 11
| Updated on: Feb 25, 2025 | 7:09 PM
Share

महिला प्रीमियर लीग स्पर्धेत बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात जायंट्सशी होत आहे. दोन्ही संघ त्यांचे शेवटचे सामने गमावल्यानंतर विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा शेवटचा सामना यूपी वॉरियर्सविरुद्ध गमावला तर गुजरातला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता.गेल्या दोन हंगामात शेवटच्या स्थानावर राहिलेला गुजरात सध्या या हंगामातही शेवटच्या स्थानावर आहे तर उत्तर प्रदेशकडून झालेल्या पराभवानंतर दिल्ली चौथ्या स्थानावर घसरली आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये यापूर्वी चार वेळा आमनेसामने आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सन तीन वेळा गुजरात जायंट्सवर मात केली आहे.गुजरातचा संघ ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू अ‍ॅशले गार्डनरवर अवलंबून आहे. तिने या हंगामात 141 धावा करत संघासाठी जोरदार कामगिरी केली आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेन लेनिंग म्हणाली की, ‘गोलंदाजी करणार आहे. हा ट्रेंड आहे असे दिसते. त्यामुळे आमच्या गोलंदाजांना सुरुवातीलाच विकेट घेण्याची चांगली संधी मिळते. एक बदल केला असून रेड्डीऐवजी तितासचा प्लेइंग 11मध्ये समावेश केला आहे. आज रात्री विजय मिळवण्यासाठी आमच्यासाठी हा सर्वोत्तम संघ आहे असे आम्हाला वाटते. तितास नेटमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत आहे. नेहमीच सुधारणा करायची असते – तुम्ही जिंकलात किंवा हरलात तरीही.’

गुजरात जायंट्सची कर्णधार गार्डनरने सांगितलं की, ‘आठवडा चांगला गेला. आम्ही तीन सामने खूप लवकर खेळलो, त्यामुळे आम्हाला बॅटरी रिचार्ज करण्याची आणि चांगला सराव करण्याची संधी मिळाली. आम्हाला स्पष्टपणे माहित आहे की बंगळुरू वडोदरापेक्षा वेगळा असणार आहे. या ठिकाणी खूप जास्त उसळी आहे. ते लवकर जुळवून घेण्याबद्दल आहे. कर्णधार म्हणून ते शांत राहण्याचा आणि सर्वोत्तम निर्णय घेण्याबद्दल आहे. दोन बदल केले आहेत, फोबी लिचफिल्ड आणि मेघना सिंग.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, ॲशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, भारती फुलमाली, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मेघना सिंग.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अ‍ॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, शिखा पांडे, तितस साधू, मिन्नू मणी.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.