AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025 RCB vs GG : नाणेफेकीचा कौल गुजरात जायंट्सच्या बाजूने, असा घेतला निर्णय

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी गुजरातला या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे.

WPL 2025 RCB vs GG : नाणेफेकीचा कौल गुजरात जायंट्सच्या बाजूने, असा घेतला निर्णय
आरसीबी विरुद्ध गुजरात जायंट्सImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 27, 2025 | 7:08 PM
Share

बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येणार आहेत. गुजरात जायंट्स अ‍ॅशले गार्डनरच्या नेतृत्वाखाली चार सामन्यांपैकी एका विजयासह गुणतालिकेत तळाशी आहे.मागच्या दोन सामन्यात आरसीबीला मुंबई इंडियन्सकडून आणि त्यानंतर डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच सुपर ओव्हरमध्ये यूपी वॉरियर्सकडून पराभव पत्करावा लागला.  त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. गुजरात जायंट्सची कर्णधार अ‍ॅशले गार्डनरने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. संपूर्ण स्पर्धेत पाठलाग करणे सोपे वाटते. आशा आहे की आपण लवकर विकेट घेऊ शकू. आपण पॉवरप्लेबद्दल बोलायचं तर गोलंदाजांनी योग्य काम केले आहे. शांत राहा, हे वैयक्तिकरित्या बोलण्याबद्दल आहे. निकाल स्वतःची काळजी घेत असतो. संघात एक बदल केला असून हेमा आली आहे.’

आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली की, ‘आम्हालाही पाठलाग करायला आवडले असते. गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही बचाव करताना खूप जवळ होतो. जवळचे सामने गमावणे खूप कठीण असते. कर्णधार म्हणून, तुम्हाला एकतर्फीपेक्षा जवळचे सामने गमावावेसे वाटतील. चाहते नेहमीच आमची ताकद असतात. प्रेमाला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), डॅनिएल व्याट-हॉज, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), रघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, किम गर्थ, प्रेमा रावत, रेणुका सिंग ठाकूर.

गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशले गार्डनर (कर्णधार), काशवी गौतम, डिआंड्रा डॉटिन, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, भारती फुलमाली.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.