MIW vs GGW : हॅली मॅथ्यूज-नॅट सायव्हर ब्रंटची स्फोटक खेळी, हरमनप्रीतचा फिनिशिंग टच, गुजरातसमोर 214 धावांचं आव्हान
Mumbai Indians Women vs Gujarat Giants Women Eliminator : हॅली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर ब्रँट या दोघींच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने वादळी खेळी करत मुंबईला 200 पार पोहचवलंय.

मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामात (WPL 2025) एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्सला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 213 धावा केल्या. मुंबईच्या पहिल्या चारही फलंदाजांनी शानदार बॅटिंग केली. मुंबईसाठी हॅली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर ब्रँट या दोघींनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 77 धावांची खेळी केली. तसेच अखेरच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीत कौर हीने 36 धावांची वादळी खेळी करत मुंबईला 213 धावांपर्यंत पोहचवलं. आता मुंबईच्या फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडल्यानंतर आता गोलंदाजांवर सर्वस्वी जबाबदारी असणार आहे.
मुंबईची बॅटिंग
गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंईने या संधीचा चांगला फायदा घेतला. यास्तिका भाटीया आणि हॅली मॅथ्यूज या दोघींनी 26 धावांची सलामी भागीदारी केली. यास्तिका 15 धावांवर बाद झाली. त्यानंतर हॅली आणि नॅट सायव्हर ब्रँट या दोघींनी झंझावाती खेळी करत शतकी भागीदारी केली. तसेच या दरम्यान वैयक्तिक अर्धशतकही झळकावलं. मात्र दोघीही एकाच धावसंख्येवर बाद झाल्या.
हॅली आणि मॅथ्यूज या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. मात्र हॅली त्यानंतर आऊट झाली. हॅलीने 50 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्ससह 77 धावा केल्या. हॅलीनंतर नॅट बाद झाली. नॅटने 41 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 77 रन्स केल्या.
दोघे सेट फलंदाज आऊट झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने दांडपट्टा सुरु केला. हरमनप्रीतने 12 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह 36 रन्स केल्या. त्यामुळे मुंबईला 210 पार मजल मारता आली. तर सजीवन सजना हीने 3 चेंडूत नाबाद 1 धाव करत हरमनप्रीतला चांगली साथ दिली. गुजरातकडून डॅनियल गिब्सन हीने 2 विकेट्स घेतल्या. तर काशवी गौतमने एकमेव विकेट मिळवली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजाना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल आणि सायका इशाक.
गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन : ॲश्ले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (विकेटकीपर), काशवी गौतम, हरलीन देओल, फोबी लिचफिल्ड, डॅनियल गिब्सन, भारती फुलमाली, सिमरन शेख, मेघना सिंग, तनुजा कंवर आणि प्रिया मिश्रा.