WPL 2025 : Nat Sciver-Brunt ची अर्धशतकी खेळी, मुंबईचा गुजरातवर 5 विकेट्सने विजय
Gujarat Giants Women vs Mumbai Indians Women Match Result : मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएल 2025 मध्ये दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं आहे. मुंबईने गुजरातचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.

मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात गुजरात जायंट्सविरुद्ध आपला दबदबा कायम ठेवला आहे. मुंबईने डब्ल्यूपीएल 2025 या हंगामात गुजरातवर मात करत विजयाचं खातं उघडलं आहे. गुजरातने मुंबईला विजयासाठी 121 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 23 बॉलआधीच पूर्ण केलं. मुंबईने 16.1 ओव्हरमध्ये 122 धावा केल्या. मुंबईसाठी नॅट सायव्हर-ब्रंट हीने सर्वाधिक धावा केल्या. तसेच इतरांनाही योगदान देत मुंबईला विजयी करण्यात हातभार लावला. मुंबईचा हा गुजरातविरुद्धचा एकूण आणि सलग पाचवा विजय ठरला.
मुंबईची बॅटिंग
मुंबईसाठी नॅट सायव्हर-ब्रंट हीने या स्पर्धेत एकूण आणि सलग दुसरं अर्धशतक केलं. नॅट सायव्हर-ब्रंटने 39 बॉलमध्ये 11 फोरसह 57 रन्स केल्या. ब्रंटने त्याआधी पहिल्या सामन्यात 80 धावांची खेळी केली होती. ब्रंट व्यतिरिक्त अमेलिया केर हीने 19 धावांचं योगदान दिलं. हॅली मॅथ्यूज हीने 17 धावा केल्या. यास्तिका भाटीया हीने 8, कॅप्टन हरमनप्रीत कौर 4 धावांचं योगदान दिलं. तर सजीवन सजना आणि जी कामालिनी या दोघींनी नाबाद खेळी करत मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं. सजीवन हीने 10 आणि जी कामलिनी हीने 4 धावा केल्या.
तर गुजरात जायंट्सकडून एकूण 5 जणींनी बॉलिंग केली. मात्र त्यापैकी तिघींनाच यश मिळालं. काश्वी गौतम आणि प्रिया मिश्रा या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर तनुजा कंवर हीने 1 विकेट घेतली. मात्र याचा काही फायदा झाला नाही.
मुंबईचा पहिला विजय
Hayley Matthews’ 3️⃣ wickets help #MI earn 2️⃣ points and is tonight’s Player of the Match👌
Scorecard ▶ https://t.co/aczhtPyWur#TATAWPL | #GGvMI | @MyNameIs_Hayley pic.twitter.com/jHy3JslY54
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 18, 2025
गुजरात जायंट्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : ॲशले गार्डनर (कॅप्टन), लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (विकेटरीपर), दयालन हेमलता, हर्लीन देओल, डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, काशवी गौतम आणि प्रिया मिश्रा.
मुंबई इंडियन्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, जी कामिलिनी , अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल आणि पारुनिका सिसोदिया.
