WPL 2023 Auction : वडील कारपेंटर, मुंबई इंडियन्समुळे मुलीच नशीब पालटलं, मिळाले इतके लाख

WPL 2023 Auction मुळे देशातील अनेक महिला क्रिकेटर्सच नशीब पालटलय. स्मृती मांधना, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा सारख्या दिग्गज क्रिकेटर्सवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडलाय.

WPL 2023 Auction : वडील कारपेंटर, मुंबई इंडियन्समुळे मुलीच नशीब पालटलं, मिळाले इतके लाख
amanjot kaurImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 9:41 AM

मुंबई : WPL 2023 Auction मुळे देशातील अनेक महिला क्रिकेटर्सच नशीब पालटलय. स्मृती मांधना, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा सारख्या दिग्गज क्रिकेटर्सवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडलाय. पंजाबची क्रिकेटर अमनजोत कौरला सुद्धा चांगले पैसे मिळालेत. अमनजोत कौर स्फोटक बॅटिंग शिवाय गोलंदाजी सुद्धा करते. मुंबई इंडियन्सने या खेळाडूला 50 लाख रुपयांना विकत घेतलं. अमनजोत कौरला टीम इंडियात आतापर्यंत फक्त एकदाच बॅटिंगची संधी मिळालीय. त्या मॅचमध्ये अमनजोतने 41 धावा फटकावल्या. त्यासाठी तिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. तुम्ही म्हणाल एक चांगली इनिंग खेळली म्हणून 50 लाख रुपये कसे काय मिळाले?

मुंबई इंडियन्सने तिच्यासाठी इतके पैसे का खर्च केले?

अमनजोत कौरवर मुंबई इंडियन्सने इतकी मोठी रक्कम खर्च केली, त्यामागे कारण तिची बॅटिंग आहे. तिच्यामध्ये आक्रमक बॅटिंग करण्याची क्षमता आहे. मोठे षटकार मारण्याची ताकत आहे. मुंबईसाठी ती फिनिशरचा रोल निभावू शकते. अमनजोत कौरची गोष्ट सुद्धा खूप रंजक आहे. एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टला शोभेल अशी ही गोष्ट आहे.

वडीलांनी हार नाही मानली

अमनजोतने वयाच्या 15 व्या वर्षी क्रिकेट अकादमीत जायला सुरुवात केली. तिला क्रिकेटर बनवण्यात वडिल भूपिंदर सिंह यांची महत्त्वाची भूमिका आहे. भूपिंदर सिंह कारपेंटरच काम करायचे. त्यांनी मुलीला क्रिकेट अकादमीत दाखल केलं. भूपिंदर सिंह मोहालीमध्ये रहायचे. मुलीला योग्य ट्रेनिंग मिळावी, यासाठी ते चंदीगडला शिफ्ट झाले. ते मुलीला क्रिकेट अकादमीत घेऊन जायचे. मुलीला क्रिकेटर बनवताना त्यांना अनेक अडचणी आल्या. पण ते मागे हटले नाहीत. वडिल काय म्हणाले?

“अमनजोतच्या यशावर वडीलांनी आनंद व्यक्त केला. अमनजोत आणि तिच्या कुटुंबासाठी अभिमानाचा दिवस आहे. तिला काही वेगळं करायचं होतं. तिची क्रिकेटर बनण्याची इच्छा होती. दुखापत झाली, तरी ती कधी मला सांगायची नाही. आई-वडीलांना समजलं, तर त्यांना वाईट वाटेल असं तिला वाटायच” असं तिच्या वडीलांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.