AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : “प्रत्येक गोष्टीचा शेवट..”, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताचा खेळाडू निवृत्त, क्रिकेट विश्वात खळबळ

Cricket Retirement : भारताचा दिग्गज खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफआधी निवृत्त झाला आहे. या स्टार खेळाडूने त्याच्या कारकीर्दीत एकूण 16 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या होत्या.

Cricket : प्रत्येक गोष्टीचा शेवट.., चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताचा खेळाडू निवृत्त, क्रिकेट विश्वात खळबळ
virat kohli and wriddhiman sahaImage Credit source: AFP
| Updated on: Feb 02, 2025 | 8:43 AM
Share

टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका होणार आहे. तर त्यानंतर आयसीसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाचा दिग्गज विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा निवृत्त झाला आहे. बंगालकडून खेळणाऱ्या या दिग्गज फलंदाजाचा रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पंजाबविरुद्धचा सामना हा अखेरचा ठरला. बंगाल टीमने ऋद्धीमानला विजयी निरोप दिला. बंगाल विरुद्ध पंजाब यांच्यातील सामना हा ऐतिहासिक इडन गार्डनमध्ये खेळवण्यात आला. सामन्यानंतर साहाला सहकाऱ्याकडून अविस्मरणीय निरोप देण्यात आला. साहाने निवृत्तीनंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक भलीमोठी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

ऋद्धीमान साहाची पोस्ट

“मी 1997 साली पहिल्यांदा क्रिकेट मैदानात पाऊल ठेवलं होतं, त्याला आता 28 वर्ष झाली आणि हा अप्रतिम प्रवास राहिला. देश, राज्य, जिल्हा, क्लब, विश्वविद्यालय, कॉलेज आणि शाळेचं प्रतिनिधित्व करणं हे माझ्या जीवनातील सर्वात सन्मानजनक बाब आहे”, असं साहाने म्हटलं.

“आज मी जो काही आहे, आयुष्यात जे काही मिळवलंय, मी शिकलेला प्रत्येक धडा, या सर्वांचं श्रेय या अद्भूत खेळाला देतो. क्रिकेटने मला आनंदाचे क्षण, अविस्मरणीय विजय आणि अमूल्य अनुभव दिले आहेत. क्रिकेटने माझी कसोटीही घेतलीय आणि त्याचा सामना कसा करायचा हे देखील शिकवलंय”, असं म्हणत साहाने त्याच्या जीवनावर असलेल्या क्रिकेटच्या प्रभावाबाबत सांगितलं.

“चढ उतार, विजय-पराजयाने या प्रवासात मला तसं घडवलंय जो मी आज आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट होतोच, त्यामुळे मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही साहाने म्हटलं. साहाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना हा 2021 साली न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. साहा महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीनंतर 2014 पासून आणि ऋषभ पंतच्या डेब्यूआधी टीम इंडियाचा नियमित सदस्य होता.

शेवटच्या सामन्यातील कामगिरी

साहाला त्याच्या अखेरच्या सामन्यात काही खास करता आलं नाही. साहाला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. तसेच बंगालने डावासह सामना जिंकल्याने दुसर्‍या डावात बॅटिंगची संधीही मिळाली नाही. बंगालने पंजाबवर 1 डाव आणि 13 धावांनी विजय मिळवला. साहाला सामन्यानंतर सहकाऱ्यांनी खांद्यावर उचलून घेतलं.

निवृत्तीनंतर काय?

साहाने निवृत्तीनंतर काय करणार? याबाबतही सांगितलंय. “आता आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात करण्याची वेळ आली आहे. आता स्वत:ला कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी समर्पित करण्याची वेळ आहे. मी ते क्षण जगायचे आणि अनुभवायचे आहेत जे क्रिकेटमुळे शक्य होऊ शकलं नाही”, असं साहाने म्हटलं.

सर्वांचे आभार

साहाने निवृत्तीनंतर कुटुंबाचे, क्रिकेटमधील इथवरच्या प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकाचे, खेळाडूंचे, टीम मॅनेजमेंटचे आभार मानले.

ऋद्धीमान साहाचा क्रिकेटला अलविदा

साहाची क्रिकेट कारकीर्द

ऋद्धीमान साहा याने टीम इंडियाचं 40 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. तसेच साहाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्रिपुरा आणि बंगालकडून खेळताना एकूण 142 फर्स्ट क्लास आणि 116 लिस्ट ए सामने खेळले. साहाने त्याच्या कारकीर्दीत एकूण 16 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.