WT20 WC: भारताने बांगलादेशला 5 गडी राखून नमवलं, विजयानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं? ते सांगितलं

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 23व्या सामन्यात भारताने बांगलादेशचा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवल्या. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने काय चुकलं त्यावर प्रकाश टाकला. त्यामुळे शेवटच्या सामन्यात चुका दुरूस्त करण्याची संधी असणार आहे.

WT20 WC: भारताने बांगलादेशला 5 गडी राखून नमवलं, विजयानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं? ते सांगितलं
WT20 WC: भारताने बांगलादेशला 5 गडी राखून नमवलं, विजयानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं? ते सांगितलं
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 25, 2026 | 10:52 PM

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील भारतीय संघाचा चौथा सामना बांगलादेशविरूद्ध झाला. या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा विजय महत्त्वाचा होता. झालंही तसंच.. भारताने बांगलादेशला 5 विकेट राखून पराभूत केलं. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमवून 136 धावा केल्या. तसेच विजयासाठी 137 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 16.5 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. यामुळे भारताच्या पदरात 2 गुण तर पडले, वरून नेट रनरेटही जबरदस्त सुधारला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. असं असताना बांगलादेशविरुद्धचा सामना कर्णधार हरमनप्रीत कौरने चुकांवर प्रकाश टाकला. तसेच पुढचा सामना महत्त्वाचा आहे आणि त्या चुका सुधारू असं हरमनप्रीत कौर म्हणाली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात एक दोन नव्हे तर चार सोपे झेल सोडले. त्यामुळे क्षेत्ररक्षण खूपच सुमार असल्याची टीका आता सोशल मीडियावरून होत आहे.

सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांकडून वारंवार झेल सोडण्याच्या परिस्थितीला सामोरे जाण्याबद्दल काय वाटतं? या प्रश्नावर हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘हो, हे खरं आहे. ते आमचे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत, पण कधीकधी परिस्थिती तशी असते. तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आम्ही फक्त यावरच बोललो की, आपण मेहनत करत राहूया, मैदानावर जास्त वेळ घालवत राहूया, ते चेंडू पकडत राहूया, जेणेकरून जेव्हा आपण मैदानात उतरू, तेव्हा आपण चांगल्या स्थितीत असू. पण दुर्दैवाने आज पुन्हा, आम्ही अनेक चेंडू गमावले, पण मला वाटते की पुढचा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि मला खात्री आहे की त्या दिवशी आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू. ‘

संघातील प्रत्येक सदस्याचा वापर करण्याबद्दल आणि भारताने सर्वोत्तम संघ संयोजन निश्चित केले आहे का? या प्रश्नावर हरमनप्रीत कौर म्हणाली, ‘मला वाटते की जेव्हा आम्ही येथे आलो, तेव्हा आमच्या मनात एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की प्रत्येक सामना एका वेगळ्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध असतो आणि त्यांच्यात वेगवेगळे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू असतात आणि त्यानुसार आम्ही आमचे प्लेइंग इलेव्हन निश्चित केले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल खूप मोकळे होतो आणि आम्ही फक्त त्या बाबतीत सर्वोत्तम संयोजन कोणते असेल याचा विचार केला. आम्ही त्यात यशस्वी होऊ.’

साखळी फेरीत करो या मरोच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया समोर आहे, या प्रश्नावर हरमनप्रीत म्हणाली की, ‘मला वाटते की ते आमच्या आवडत्या प्रतिस्पर्ध्यांपैकी एक आहेत आणि आशा आहे की त्या दिवशी आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू. आम्हाला माहित आहे की या दोन स्पर्धा आणि प्रत्येक सामना ‘जिंकणेच आवश्यक’ आहे आणि कधीकधी जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीत, तेव्हा तुम्हाला तुमची सर्वोत्तम कामगिरी करावी लागते. आणि मला वाटते की तो सामना खूप महत्त्वाचा आहे आणि जर आम्ही तो जिंकलो, तर मला वाटते की आम्हाला त्यातून निश्चितपणे खूप आत्मविश्वास मिळेल. आणि मला वाटते की नवी मुंबईत त्यांच्याविरुद्ध मिळालेल्या शेवटच्या विजयाने आम्हाला खूप आत्मविश्वास दिला आहे आणि अनेक अडथळे दूर केले आहेत, आणि आशा आहे की त्या दिवशी आम्ही आमचा सर्वोत्तम क्रिकेट खेळू.’

Follow Us