AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs BANW : शफाली वर्माचं चाबूक अर्धशतक, टीम इंडियाचा जबरदस्त विजय, बांगलादेशचा 5 विकेट्सने धुव्वा

India vs Bangladesh Women Match Result : टीम इंडियाने पाकिस्तान, नेदरलँड्सनंतर आता बांगलादेशला पराभूत करुन एकूण 6 गुणांची कमाई केली आहे. शफाली वर्मा ही या विजयाची नायिका ठरली आहे.

INDW vs BANW : शफाली वर्माचं चाबूक अर्धशतक, टीम इंडियाचा जबरदस्त विजय, बांगलादेशचा 5 विकेट्सने धुव्वा
Shafali Verma Fifty Team India vs BangaldeshImage Credit source: bcci women X Account
| Updated on: Jun 25, 2026 | 11:28 PM
Share

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी ट्रॅकवर परतली आहे. टीम इंडियाने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील 23 व्या सामन्यात बांगलादेशवर मात करत 2 गुणांची कमाई केली आहे. बांगलादेशने टीम इंडियासमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान ओपनर शफाली वर्मा हीच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज आणि सुरक्षितपणे पूर्ण केलं. शफालीला तिच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं. भारताचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीतील आपला दावा आणखी मजबूत केला आहे. टीम इंडियाने 137 धावांचं आव्हान हे 5 विकेट्स राखून 19 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 16.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 139 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह उपांत्य फेरीतील आपलं आव्हान कायम राखलं आहे.

सामन्याचा धावता आढावा

बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशसाठी कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आलं नाही. बांगलादेशसाठी जुवैरिया फिरदौस हीने सर्वाधिक 33 धावा केल्या. निगर सुल्ताना हीने 32 धावांचं योगदान दिलं. तर सोभना मोस्त्री हीने 22 रन्स केल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियासाठी राधा यादव हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्यात. श्री चरणी हीने दोघींना बाद केलं. तर नंदीनी शर्मा आणि रेणुका सिंह ठाकुर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडियाला हा सामना आणखी लवकर संपवता आला असता. मात्र बांगलादेशने भारताला 5 झटके दिल्याने सामना लांबला. स्मृती मंधाना हीने निराशा केली. स्मृतीने 8 धावा केल्या. भारतासाठी शफाली वर्मा हीने सर्वाधिक 53 धावांचं योगदान दिलं. शफालीने या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. यास्तिका भाटीया हीने 23 रन्स केल्या. ऋचा घोष 10 धावा करुन माघारी परतली. जेमिमाह रॉड्रिग्स हीने 26 रन्स केल्या. तर कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी भारताला नाबाद राहून विजयापर्यंत पोहचवलं. हरमनप्रीतने 13 आणि दीप्तीने 5 धावा केल्या. बांगलादेशसाठी रितू मोनी हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला