WTC 2023 Final Ind vs Aus : टीम इंडियाच्या खेळाडूंच्या हातावर काळी पट्टी, नक्की कारण काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू आणि पंच यांनी हातावर काळी पट्टी बांधली आहे. त्यामुळे त्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न पडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात

WTC 2023 Final Ind vs Aus : टीम इंडियाच्या खेळाडूंच्या हातावर काळी पट्टी, नक्की कारण काय?
WTC 2023 Final Ind vs Aus : ...म्हणून टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि पंचांनी डाव्या हातावर बांधलीय काळी पट्टी Image Credit source: BCCI Twitter
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 4:36 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वॉर्नर आणि ख्वाजाने सलामीला येत सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या तासात विकेट जाणार नाही याची काळजी घेतली. मात्र मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ख्वाजाला तंबूत परतावं लागलं. दुसरीकडे, वॉर्नर आणि लाबुशेन यांनी संघाचा डाव सावरला. ख्वाजा बाद झाल्यानंतर झटपट विकेट मिळतील हा भ्रम या जोडीने मोडीत काढला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा काहीसा वैतागलेला दिसला. उमेश यादवची गोलंदाजी वॉर्नरने चांगलीच चोपून काढली. एका षटकात चार चौकार ठोकले. पण असा खेळ सुरु असताना खेळाडूंनी हातावर काळी पट्टी का बांधली आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

खेळाडूंनी ही काळी पट्टी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या ट्रेन अपघातातील मृतांना श्रद्धांजली म्हणून बांधली आहे. कोरोमंडेल एक्स्प्रेस ट्रेन अपघातात 280 जणांचा मृत्यू झाला. तर 1 हजाराहून अधिक लोक जखमी झाले. “पहिल्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाने मौन पाळत ट्रेन दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.” असं ट्वीट बीसीसीआयने केलं आहे.

दुसरीकडे, हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. गेल्या दहा वर्षापासून भारताला आयसीसी चषकाचा दुष्काळ सोसावा लागत आहे. त्यामुळे हा सामना भारताला जिंकणं गरजेचं आहे. यापूर्वी 2021 टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतिम सान्यातही टीम इंडियाने काळी पट्टी बांधली होती. त्यावेळी महान धावपटून मिल्खा सिंह यांचं निधन झालं होतं. तेव्हा त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ

WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.