IND vs WI : टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेत बदल?
IND vs WI 2nd Test All Details : टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीत एकूण दुसऱ्या आणि मायदेशातील पहिल्या कसोटी मालिकेत विजयाने सुरुवात केली. भारताने यासह विंडीज विरुद्ध 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली.

टीम इंडिया सध्या मायदेशात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप 2025-2027 या साखळीतील आपली दुसरी तर मायदेशातील पहिली मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आली आहे. उभयसंघातील ही 2 सामन्यांची कसोटी मालिका आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने पहिलाच सामना हा अवघ्या अडीच दिवसात संपवला. भारताने पाहुण्या विंडीज विरुद्ध डाव आणि 140 धावांनी एकतर्फी विजयी साकारला. भारताने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
त्यानंतर आता टीम इंडिया दुसरा आणि अंतिम सामना जिंकून विंडीजला 2-0 ने व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडीजचा हा सामना जिंकून भारताला मालिका जिंकण्यापासून रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. विंडीजला यात किती यश येतं? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल. उभयसंघातील दुसरा सामना हा कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना कधी?
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना हा शुक्रवार 10 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेता येतील.
पहिल्या सामन्यात काय झालं होतं?
पहिल्या सामन्यात विंडीजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने विंडीजला 162 रन्समध्ये गुंडाळलं. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात 400 पार मजल मारली. भारताने 5 बाद 448 धावांवर डाव घोषित केला. भारताने अशाप्रकारे 286 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर टीम इंडियाने विंडीजला दुसऱ्या डावात आघाडी मोडीत काढण्याआधीच गुंडाळलं. भारताने विंडीजला दुसऱ्या डावात 146 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे डाव आणि 140 धावांनी सामना जिंकला.
