WTC Final : चौथ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वीच पावसाचा व्यत्यय, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सुरु केला ‘हा’ खेळ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) चौथ्या दिवशीचा खेळ सुरु होण्याची सर्वचजण आतरुतेने वाट पाहत आहेत. मात्र पावसाने मैदानात हजेरी लावल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंचा वेगळाच खेळ रंगला आहे.

WTC Final : चौथ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वीच पावसाचा व्यत्यय, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सुरु केला 'हा' खेळ
southampton Weather
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jun 21, 2021 | 3:22 PM

साऊदम्पटन : इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC WTC Final) पुन्हा एकदा खराब हवामानामुळे व्यत्यय आला आहे. चौथ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वीच वातावरण खराब असल्याने खेळ उशिराने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हवामानाच्या स्थितीचा अंदाज घेऊन चौथ्या दिवशीचा खेळ सुरु केला जाणार आहे. सामना अद्याप सुरु झाला नसल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंनी थेट टेबल टेनिसचा खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने खेळाडूंचा टेबल टेनिस खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. (WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand Match will Start Late so kiwis playing table tenis)

अत्यंत महत्त्वाच्या या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींचा अडथळा समोर येत आहे. पहिल्य दिवशीचा संपूर्ण खेळ पाऊस असल्यामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बऱ्याच अडथळ्यानंतर अखेर खराब प्रकाशमानामुळे पंचांनी खेळ 64.4 ओव्हरनंतर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने तोवर 3 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी वातावरण चांगले असल्याने भारताचा संपूर्ण डाव 92.1 ओव्हरचा झाल्यानंतर न्यूझीलंड संघ देखील 49 ओव्हर खेळू शकला. न्यूझीलंड 116 धावांनी पिछाडीवर असला तरी केवळ दोनच विकेट गमावल्याने चौथा दिवस सामन्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पण त्यातच साऊदम्पटनमधील हवामानामुळे तूर्तासतरी सामना सुरु होण्यास विलंब होत आहे.

सामन्यावर किंवींची पकड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर (WTC Final 2021) न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याचा तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला होता. आधी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ 217 धावांत गारद केला. त्यानंतर फलंदाजांनी भारताचा गोलंदाजांना जेरीस आणलं. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्या 116 धावांची आघाडी शिल्लक आहे. परंतु भारताला 49 षटकांमध्ये केवळ दोनच बळी मिळवता आल्याने सामन्यात सध्या तरी न्यूझीलंड सरसआहे.

(WTC Final 2021 Southampton Weather Forecast india vs New Zealand Match will Start Late so kiwis playing table tenis)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें