Yashasvi Jaiswal : मुंबई इंडियन्स विरुद्ध शानदार शतक ठोकल्यानंतर यशस्वी जैस्वाल काय म्हणाला? VIDEO

Yashasvi Jaiswal : मुंबई इंडियन्स विरुद्ध यशस्वी जैस्वालची बॅट चालली. त्याने तुफानी शतक ठोकलं. एक मोठा रेकॉर्ड मोडला. जयपूरमध्ये या डावखुऱ्या फलंदाजाने 7 सिक्स मारले. आयपीएल करिअरमधील दुसरं शतक झळकावलं. यशस्वी जैस्वालच्या झंझावतात मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का बसला.

Yashasvi Jaiswal : मुंबई इंडियन्स विरुद्ध शानदार शतक ठोकल्यानंतर यशस्वी जैस्वाल काय म्हणाला? VIDEO
yashasvi jaiswal century Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 7:59 AM

IPL 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमने विजयाचा धडाका लावला आहे. राजस्थान रॉयल्सने सोमवारी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला हरवलं. संजू सॅमसनच्या टीमने पॉइंट्स टेबलमधील आपलं स्थान अधिक बळकट केलं आहे. राजस्थानला या विजयासह आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ही बातमी म्हणजे ओपनर यशस्वी जैस्वालच शतक. यंदाच्या सीजनमध्ये यशस्वीच्या बॅटमधून धावा आटल्या होत्या. मागच्या सात सामन्यात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघालं नव्हतं. यशस्वीचा सर्वश्रेष्ठ स्कोर 39 होता. पण सवाई मानसिंह स्टेडियममध्ये जैस्वाल एका वेगळ्याच रंगात दिसला. या खेळाडूने तुफानी बॅटिंग करत सेंच्युरी पूर्ण केली.

यशस्वी जैस्वालने जयपूरच्या मैदानात फोर-सिक्सचा पाऊस पाडला. या खेळाडूने एकूण 7 सिक्स मारले. 59 चेंडूत त्याने शतक झळकावलं. आयपीएल करिअरमधील त्याचं हे दुसरं शतक आहे. या शतकासह यशस्वी जैस्वालने एक मोठा रेकॉर्डही रचला आहे. तो सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये दोन शतकं झळकवणारा खेळाडू बनला आहे. यशस्वी जैस्वालच आता 22 वर्षांचा आहे.

शतकानंतर यशस्वी जैस्वाल काय म्हणाला?

यशस्वी जैस्वालने शतक झळकवल्यानंतर मागच्या 7 सामन्यातील अपयशाला यशामध्ये कसं बदललं त्या बद्दल सांगितलं. जैस्वाल म्हणाला की, “मला फक्त चेंडू दिसत होता. मागच्या सात सामन्यातील अपयशाची गोष्ट माझ्या डोक्यात नव्हती” “मी क्रिकेटिंग शॉट्स खेळण्यावर लक्ष दिलं. टीममधील सिनियर खेळाडूंनी साथ दिली” कोच कुमार संगकारा आणि कॅप्टन संजू सॅमसन यांनी सातत्याने संधी दिल्याबद्दल त्याने आभार मानले. नेट्समध्ये केलेली कठोर मेहनत उपयोगात आली, असं जैस्वाल म्हणाला. यशस्वीचा खराब फॉर्म हीच राजस्थानसाठी चिंतेची बाब होती. पण आता हीच कमकुवत बाजू त्यांची ताकद बनली आहे. राजस्थान रॉयल्सला रोखणं आता प्रतिस्पर्धी टीम्सना अजिबात सोपं नसेल.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.