Yashasvi Jaiswal याला रोहितची हवा, मैदानात शिव्या देत म्हणाला.., पाहा व्हीडिओ
Yashasvi Jaiswal Viral Video | रोहित शर्मा याच्यानंतर आता मुंबईकर यशस्वी जयस्वाल याचा भर मैदानात शिवी देतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा व्हीडिओ.

राजकोट | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडवर 434 धावांनी मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा विजय प्राप्त केला. कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. यशस्वी जयस्वाल याने या सामन्यात विजयी भूमिका बजावली. यशस्वीने नाबाद द्विशतकी खेळी केली. त्याचं या कामगिरीसाठी सोशल मीडियावर भरभरून कौतुक करण्यात आलं. मात्र सामन्याच्या काही तासांनंतर यशस्वीचा शिवी देतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
नक्की काय झालं?
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावादरम्यानचा हा व्हीडिओ आहे. यशस्वी जयस्वाल आणि डेब्युटंट सरफराज खान ही मुंबईकर युवा जोडी मैदानात बॅटिंग करत होती. यशस्वी जयस्वाल द्विशतकाच्या उंबरठ्यावर होता. यशस्वी 199 धावांवर होता. त्याला द्विशतकासाठी अवघ्या 1 धावेची गरज होती. यशस्वी स्ट्राईक एंडवर होता. या दरम्यान यशस्वीने सरफराजसोबत बोलता बोलता शिवी दिली. मात्र ही शिवी कुणाला उद्देशून नव्हती. पण यशस्वीच्या हा व्हीडिओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर कॅप्टन रोहित शर्माच्या संगतीचा परिणाम झाल्याचं म्हटलं जात आहे.
व्हीडिओत नेमकं काय?
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 96 ओव्हरचा खेळ झाला होता. यशस्वी 199 धावांसह स्ट्राईक आणि सरफराज 50 धावांसह नॉन स्ट्राईक एंडवर होता. या दरम्यान दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचा हा व्हीडिओ व्हायरल झालाय. “शिवी देत इतकी मेहनत केली आहे”, असं यशस्वी या व्हीडिओत म्हणतो. तर त्यावर सरफराज खान त्याला “हो जायेगा (द्विशतक) येशू पहेले मत भाग जाना”, असं म्हणतोय.
यशस्वीचा व्हीडिओ व्हायरल
View this post on Instagram
मुंबईकर फलंदाजांची आक्रमक बॅटिंग
दरम्यान सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल या दोघांना एकत्र बॅटिंग करताना पाहून क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग या दोघांची आठवण झाली. यशस्वी आणि सरफराज या दोघांनी दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी 159 चेंडूंमध्ये 172 धावांची नाबाद भागीदारी केली. सरफराज 68* आणि यशस्वीने 214* धावा केल्या. या जोरावर टीम इंडियाने दुसरा डाव 430 धावांवर घोषित करत इंग्लंडला 557 धावांचं आव्हान दिलं. मात्र इंग्लंड अवघ्या 122 धावांवर ऑलआऊट झाली आणि टीम इंडिया चौथ्याच दिवशी विजयी झाली.
