AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यासीन मलिकच्या शिक्षेने Shahid Afridi ला मिर्च्या झोंबल्या, भारताविरोधात गरळ ओकली

आता बंदी घातलेली संघटना JKLF चा प्रमुख यासीन मलिकला शिक्षा होण्याआधी शाहिद आफ्रिदीला मिर्च्या झोंबल्या आहेत. आफ्रिदीने यासीन मलिकला (Yasin Malik) शिक्षा ठोठावण्याआधी भारतविरोधी वक्तव्य केलं आहे.

यासीन मलिकच्या शिक्षेने Shahid Afridi ला मिर्च्या झोंबल्या, भारताविरोधात गरळ ओकली
Shahid-Afridi
| Updated on: May 25, 2022 | 6:30 PM
Share

मुंबई: क्रिकेटमधुन निवृत्ती घेतली असली, शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) नेहमीच चर्चेत असतो. आफ्रिदीने अलीकडच्या काही वर्षात सातत्याने भारतविरोधी भूमिका घेतली आहे. काश्मीर मुद्यावरुन सातत्याने त्याने भारत विरोधी वक्तव्य केली आहेत. आता बंदी घातलेली संघटना JKLF चा प्रमुख यासीन मलिकला शिक्षा होण्याआधी शाहिद आफ्रिदीला मिर्च्या झोंबल्या आहेत. आफ्रिदीने यासीन मलिकला (Yasin Malik) शिक्षा ठोठावण्याआधी भारतविरोधी वक्तव्य केलं आहे. यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात NIA कोर्टाने दोषी ठरवलं आहे. यासीन मलिकला शिक्षा ठोठावण्याआधी शाहीद आफ्रिदी आणि अन्य पाकिस्तानी नेत्यांनी मोदी सरकार आणि भारताविरोधात वक्तव्य केली आहेत. टि्वटस केली आहेत.

शाहिद आफ्रिदीने काय टि्वट केलय

“भारत नेहमीप्रमाणे मानवाधिकार उल्लंघनाविरोधात उठणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे हे प्रयत्न निरर्थक आहेत. यासीन मलिकवर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. त्याने काश्मीरचा स्वातंत्र्य संघर्ष थांबणार नाही. मी संयुक्त राष्ट्राला विनंती करतो की, त्यांनी काश्मिरी नेत्यांविरोधात सुरु असलेल्या या बेकायद, अन्यायकारक गोष्टींची दखल घ्यावी” असं शाहिद आफ्रिदीने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

कोणी, कोणी टि्वट केलय?

फक्त शाहिद आफ्रिदीच नव्हे, तर पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ, माजी पंतप्रधान इमरान खान यांनी सुद्धा यासिन मलिकला शिक्षा ठोठावू नये, यासाठी टि्वट केले आहेत. भारताच्या अंतर्गत विषयात पाकिस्तानी नेते आणि क्रिकेटपटू नेहमीच भाष्य करत असतात.

कोणत्या कलमांतर्गंत यासीन दोषी?

कलम 16 (दहशतवादी कारवाया), 17 (दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि 20 (दहशतवादी गट किंवा संघटनेचा सदस्य असणे) या कलमांसाठी तो दोषी असल्याचे यासीन मलिकने न्यायालयाला सांगितले होते. UAPA आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120-B (गुन्हेगारी कट) आणि 124-A (देशद्रोह) अशा विविध गुन्ह्यात यासिनला दोषी ठरवण्यात आले आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.