AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही क्रिकेटपटूंना समुद्रात फेकू नाही शकत, वेंगसरकरांना टीम इंडियाचा वेस्ट इंडिज होण्याची भीती?

ग्रुम करणं, खेळाडूंना घडवणं हेच महत्वाचं आहे. कारण तुम्ही खेळाडूंना समुद्रात फेकून आता पोहून दाखवा अशी अपेक्षा करु शकत नाहीत. माझा त्यावर विश्वास नाही.

तुम्ही क्रिकेटपटूंना समुद्रात फेकू नाही शकत, वेंगसरकरांना टीम इंडियाचा वेस्ट इंडिज होण्याची भीती?
रोहीत शर्माच्या निवडीवर दिलीप वेंगसरकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 11:54 AM
Share

धडाडीचं बॅटसमन रोहीत शर्माची वन डे आणि टी 20 च्या कप्तानपदी निवड केल्यानंतर उलटसुटल प्रतिक्रिया उमटतायत. ट्विटरवर तर कोहलीच्या बाजूनं आणि बीसीसीआयच्या विरोधात कँपेन चालू आहे. मिम्सची लाट आलीय. अर्थातच कोहलीला ज्या पद्धतीनं काढून टाकलं त्यावर ह्या प्रतिक्रिया उमटतायत. काही माजी क्रिकेटपटूंनीही यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलीय. त्यात काही कोहलीच्या बाजूनं दिसतायत तर काही रोहीत शर्माच्या. अर्थातच सर्वांच्याच प्रतिक्रिया लक्षात घेऊन एखादं काम पूर्ण होऊ शकत नाही. काही दिग्गज आहेत ज्यांच्या प्रतिक्रियेकडे दूर्लक्ष करता येणार नाही. आणि यात आहेत दिलीप वेंगसरकर. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी, तरुण खेळाडूंना आपण समुद्रात तर फेकू शकत नाहीत असं म्हणत रोहीतकडे दिलेल्या नेतृत्वाचं समर्थन केलंय. त्यावर अर्थातच कोहली फॅन्स भडकण्याची चिन्हं आहेत.

नेमकं काय म्हणाले वेंगसरकर? इंडियन एक्स्प्रेसमध्ये दिलीप वेंगसरकर यांनी एक लेखच लिहिला आहे. यात त्यांनी वेस्ट इंडिज क्रिकेटची का वाताहत झाली तेही नमुद करण्याचा प्रयत्न केलाय. पण सुरुवात त्यांनी रोहीत शर्माची कॅप्टन्सीनं केलीय. त्यावर ते म्हणतात- रोहीत शर्माला कॅप्टन बनवून बीसीसीआयनं एक योग्य निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून रोहीत चांगला खेळतोय आणि तो कप्तानीची वाट बघत होता. त्यामुळे हा एक योग्य निर्णय मला वाटतो.

विराट आता लक्ष केंद्रीत करु शकतो ‘रोहीतला वन डे आणि टी 20 चा कर्णधार केल्यामुळे विराट कोहली आता टेस्ट क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करु शकतो. दुसरीकडे रोहीत हा व्हॉईट बॉल क्रिकेटवर कॉन्सनट्रेट करु शकतो. विराटनं कप्तान म्हणून तेही व्हॉईट बॉल क्रिकेटचा कप्तान म्हणून चांगली कामगिरी केलीय. आता त्याच्या खांद्यावरचं ओझं शंभर टक्के कमी होईल. सध्यस्थितीत तो जगातला सर्वोत्तम बॅटसमनपैकी एक आहे. त्यानं काही सर्वोत्तम खेळी त्याच्या नावावर केलेल्या आहेत. त्यामुळे त्याला टेस्ट क्रिकेट खेळायला मदत होऊ शकेल. कारण टेस्ट हाच क्रिकेटचा अल्टीमेट प्रकार आहे.’

दोन पॉवर सेंटर रोहीत आणि विराट (Rohit Sharma and Virat Kohli) यांच्यातला वाद गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आता बीसीसीआयनं (BCCI) दोन कप्तान केल्यामुळे दोघातले वाद विकोपाला जातील असही काहींना वाटतं. त्यावर वेंगसरकर म्हणतात- ड्रेसिंग रुममध्ये दोन कर्णधार असण्याने काही प्रॉब्लेम होईल असं मला वाटत नाही. कारण कारण सरतेशेवटी ते व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यांना जीही जबाबदारी दिली जाईल ती ते पार पाडतील. आणि तरुण क्रिकेटपटूही त्या दृष्टीकोनातूनच बघतील.

नॅशनल सलेक्शन कमिटीनं काय करावं? सौरव गांगुली आणि जय शहा यांच्या नेतृत्वातल्या बीसीसीआयनं अलिकडच्या काळात मोठे निर्णय घेतलेले आहेत. त्यात मग विराटला बदलणं असो की द्रविडला कोच म्हणून नियुक्त करणं. त्यावर साधकबाधक प्रतिक्रियाही उमटल्यात. पण वेंगसरकर नॅशनल सलेक्शन कमिटीनं काय करावं त्यावरही जोर देतायत. ते म्हणतात- नॅशनल सलेक्शन कमिटीनं आता एक महत्वाचं काम करावं. ते म्हणजे भविष्यकाळात कॅप्टन्सीसाठी कुणाला तरी ग्रुम करणे. म्हणजे फक्त कप्तानच नाही तर तसे खेळाडूही तयार करावे लागतील. कारण पर्याय उभे केले तरच ज्यावेळेस कुणी रिटायर होईल त्यावेळेस पोकळी भासणार नाही. पुढं वेंगसरकर वेस्ट इंडिज क्रिकेटं उदाहरण देत म्हणतात- एकदा जर पोकळी निर्माण झाली तर स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. वेस्ट इंडिज क्रिकेटकडे बघा. त्यांनी 15 वर्षे क्रिकेटवर राज्य केलं आणि ते नंबर 1 वरुन तळाला गेले. सध्या ते 8 व्या नंबरवर आहेत.

धोनी आणि इशांतला घडवलं दिलीप वेंगसरकर हे स्वत: सलेक्शन कमिटीचे प्रमुख होते. त्याचा अनुभव सांगताना ते लिहितात- माझ्या कार्यकाळात आम्ही अनिल कुंबळेला कप्तान बनवलं आणि त्याच वेळेस आम्ही एम.एस. धोनी (M.S.Dhoni) आणि इतरांना ग्रुम केलं. मी इशांत शर्मालाही (Ishant Sharma) ग्रुम केलं आणि त्याला खेळायला मिळणार नाही हे माहित असतानाही, इंग्लंडला घेऊन गेलोत. पण ऑस्ट्रेलियात तो हाताशी येणार हे माहिती होतं. ग्रुम करणं, खेळाडूंना घडवणं हेच महत्वाचं आहे. कारण तुम्ही खेळाडूंना समुद्रात फेकून आता पोहून दाखवा अशी अपेक्षा करु शकत नाहीत. माझा त्यावर विश्वास नाही.

हे सुद्धा वाचा:

‘टाटा’ची वाहाने महागणार; एक जानेवारीपासून नवे दर लागू

Face Serum : निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी ‘हे’ घरगुती फेस सीरम फायदेशीर! 

Nagpur | खबरदार झाडांना खिळे ठोकाल तर… तीन दिवसांत जाहिरात काढण्याची तंबी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.