डेव्हिड वॉर्नरचा रोहित शर्मावर चोरीचा आरोप, सोशल मीडियावर घमासान

टी - 20 विश्वचषकाच्या खेळपट्टीवर रोहित शर्माची फलंदाजी आणि त्याचा परिणाम अद्याप पाहायला मिळालेला नाही. पण, त्याआधी त्याच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

डेव्हिड वॉर्नरचा रोहित शर्मावर चोरीचा आरोप, सोशल मीडियावर घमासान
David Warner - Rohit Sharma

मुंबई : टी – 20 विश्वचषकाच्या खेळपट्टीवर रोहित शर्माची फलंदाजी आणि त्याचा परिणाम अद्याप पाहायला मिळालेला नाही. पण, त्याआधी त्याच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने रोहित शर्मावर हा गंभीर आरोप केला आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला नाही ना? कारण तुम्ही समजताय तसा हा चोरीचा आरोप नाही. डेव्हिड वॉर्नरने रोहितला डिवचण्याचा प्रयत्न केलेला नाही. ही फक्त रोहितच्या सोशल मीडिया पोस्टवरील वॉर्नरची प्रतिक्रिया आहे. (You copying my Tiktok; david warner comment on Rohit Sharma instagram post wearing india t20 world cup jersey)

वास्तविक, रोहित शर्माने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना डेव्हिड वॉर्नरने लिहिले आहे की ‘तू माझ्या टिक टॉक स्टाईलची कॉपी करत आहेस’. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या हॉटेलच्या खोलीत दिसत आहे. त्याने एका वेगळ्याच स्टाईलमध्ये टीम इंडियाची नवी वर्ल्ड कप जर्सी परिधान केली आहे. या व्हिडीओवर वॉर्नरने गंमतीदार कमेंट केली आहे.

रोहित शर्माच्या या पोस्टवर, डेव्हिड वॉर्नरने त्याच्यावर त्याच्या टिक-टॉक स्टाईलची कॉपी केल्याचा आरोप केला आहे, तर युजवेंद्र चहल बेडबाबत कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. भारत हा सुपर 12 मध्ये असल्याने सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यात भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. पण तत्पूर्वी सराव म्हणून भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत भिडणार आहे. यातीलच एक सामना काल दुबईच्या मैदानात पार पडला. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड (India vs England) आमने-सामने होते. या सामन्यात भारताने 7 गडी राखून बाजी मारली.

इतर बातम्या

…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो

(You copying my Tiktok; david warner comment on Rohit Sharma instagram post wearing india t20 world cup jersey)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI