AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | “माझ्या प्रायव्हेट पार्टला..”, तरुणीचा टीम इंडियाच्या क्रिकेटवर गंभीर आरोप

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर असलेली तरुणी आणि टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ यांच्यात सुरु असलेला वाद अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. या दरम्यान आता तरुणीने पृथ्वीवर फार गंभीर आरोप केलेत.

Team India | माझ्या प्रायव्हेट पार्टला.., तरुणीचा टीम इंडियाच्या क्रिकेटवर गंभीर आरोप
team india Image Credit source: बीसीसीआय
| Updated on: Feb 21, 2023 | 11:47 PM
Share

मुंबई : टीम इंडिया एकाबाजूला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा स्टार खेळाडू हा चांगलाच अडचणीत सापडला आहे. या खेळाडूवर तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हा क्रिकेटपटूची डोकेदुखी वाढली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर या क्रिकेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता या तरुणीने गंभीर आरोप केले आहेत.

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर असलेली तरुणी आणि टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ यांच्यात सुरु असलेला वाद अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. या दरम्यान आता तरुणीने पृथ्वीवर फार गंभीर आरोप केलेत.

मुंबईतील न्यायालयाने पृथ्वीसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी आणि त्याच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने तोडफोड केल्याने तरुणी आणि 3 जणांना 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. जामीनावार बाहेर आल्यानंतर तरुणीने हीने पृथ्वीवर गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणीने प्रतिक्रिया दिली. “आम्ही कुणाला मारलं नाही. तसेच पैशांची मागणीही केली नाही. आमच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत”, अशी प्रतिक्रिया या तरुणीने दिली.

“आम्ही काही सेल्फीबाबत म्हणाले नाही. आम्ही आमच्या मस्तीत होतो. तेव्हा माझा मित्र व्हीडिओ काढायला लागला. तेव्हा मी पाहिलं की ती लोकं माझ्या मित्राला मारत होते. पुरावा दाखवता यावा यासाठी माझा मित्र व्हीडिओ काढ होता. मी माझ्या मित्राला बचावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर ती लोकं मला बेसबॉलने मारायला लागले. मला 1-2 जणांनी मारलं. तसंच माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. इतकंच नाही, तर मला कानाखाली मारली”, असे गंभीर आरोप या तरुणीने केले.

या प्रकरणात तरुणीच्या तक्रारीनंतर पृथ्वी आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला. पृथ्वीशिवाय आशिष यादव, ब्रिजेश आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना गिल हीने आयपीसीच्या कलम 34, 120 बी, 144, 146, 148, 149, 323, 324, 351, 354 आणि 509 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नक्की प्रकरण काय?

व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबईसह संपूर्ण देशात प्रेमाच्या सणाचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील सांताक्रूझमध्ये 14 फेब्रुवारी रोजी एका हॉटेलच्या बाहेर पृथ्वीसोबत कथितपणे मारहाण झाली. पृथ्वीच्या कारवर बेसबॉल बॅटने तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तरुणी आणि तिचे इतर मित्र यांच्याशी पृथ्वीचा वाद झाला. या दोघांना पृथ्वीसोबत सेल्फी हवा होता. मात्र पृथ्वीने यांना आपल्यासोबत सेल्फी घेण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद आणखी वाढला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यानंतर हे सर्व प्रकरण घडलं. दरम्यान आता या प्रकरणात काय होतं, याकडे लक्ष असणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.