ZIM vs IND: रोहितला निवृत्तीनंतर मोठा झटका, कॅप्टन गिलकडून पहिल्याच मालिकेत रेकॉर्ड ब्रेक
Zimbabwe vs India T20i Series: भारतीय क्रिकेट संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात झिंबाब्वेचा 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला आहे.

कॅप्टन रोहित शर्मा याने टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर निवृत्ती घेतली. त्यानंतर झिंबाब्वे दौऱ्यासाठी युवा शुबमन गिल याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. शुबमनने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला झिंबाब्वे विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 4-1 ने विजय मिळवून दिला. शुबमनने आपल्या युवा सहकाऱ्यांसह आणि दिग्गजांच्या अनुपस्थितीत मालिका जिंकली. शुबमन गिलने या मालिका विजयासह कॅप्टन म्हणून मोठा रेकॉर्ड केला आहे. वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पहिल्याच मालिकेत शुबमनने रोहित शर्मा याला मागे टाकत 7 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
शुबमन गिलने कॅप्टन म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत टीम इंडियाला विजयी केलं. शुबमनने कॅप्टन्सीसह फलंदाज म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली. शुबमनने 5 सामन्यांमध्ये 42.50 च्या सरासरी आणि 125.92 च्या सरासरीने 170 धावा केल्या. शुबमनने या मालिकेत एकूण 2 अर्धशतकं ठोकली. शुबमन या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमन यासह एका टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्यामुळे शुबमन गिलसाठी त्याच्या कारकीर्दीतील पहिलीवहिली मालिका हा अविस्मरणीय अशी ठरली आहे.
याआधी रोहित शर्मा एका टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या स्थानी होता. रोहितने 2017 साली श्रीलंका विरूद्धच्या टी 20 सीरिजमध्ये 162 धावा केल्या होत्या. मात्र आता शुबमनने रोहितचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच एका टी 20 मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने 2021 साली इंग्लंड विरुद्ध 231 धावा केल्या होत्या. तसेच 2019 साली विंडिज विरुद्ध 183 धावा केल्या होत्या.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.
झिम्बाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.
