AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Story: प्रेमात पडल्यानंतर भुवनेश्वर कुमारला सापडली स्विंगची लय! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Love Story: क्रिकेटर भुवनेश्वर कुमार आणि नुपूर नागर यांचं प्रेम कहाणी इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळी आहे. दोघं एकमेकांना ओळखत होते. पण तिसऱ्या प्रपोजला नुपूरने त्याला होकार दिला.

Love Story: प्रेमात पडल्यानंतर भुवनेश्वर कुमारला सापडली स्विंगची लय! जाणून घ्या नेमकं काय घडलं?
प्रेम व्यक्त करण्यासाठी भुवनेश्वर कुमारनं उचललं असं पाऊल! नुपूरनं विचारलं क्रिकेटनंतर... Image Credit source: Nupur Instagram
| Updated on: Feb 11, 2023 | 4:49 PM
Share

मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंच्या लव्हस्टोरी हा चर्चेचा विषय राहिला आहे. वेगवान गोलंदाज आणि स्विंगचा बादशाह अशी ओळख असलेल्या भुवनेश्वर कुमारची प्रेमकहाणी काही वेगळी नाही. भुवनेश्वर कुमार आणि नुपूर नागर एकमेकांना 12-13 वर्षांचे असल्यापासून ओळखत होते.सुरुवातीला मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी नोव्हेंबर 2017 मध्ये लग्न केलं. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये भुवी आणि नुपूर आई-वडिलांच्या भूमिकेत आले.पण या दोघांचं प्रेमकहाणी सुरु झाली खरी पण मधल्या काळात नेमकं काय झालं असा प्रश्न भुवीच्या चाहते त्याला कायम विचारत असतात. या प्रश्नाला भुवनेश्वर कुमारनं एका मुलाखतीत उत्तर दिलं आणि बॉल स्विंग करण्यासाठी कशी मदत त्याबद्दलही सांगितलं. भुवनेश्वर कुमार सुरुवातीच्या काळात क्रिकेटमध्ये संघर्ष करत होता. इतकंच काय तर रणजी क्रिकेटमध्येही निवड झाली नव्हती. असं असूनही नुपूरने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. कठीण काळात नुपूरनं भुवीला मोलाची साथ दिली. भुवनेश्वर कुमारनं नुपूरला तीनदा प्रपोज केलं होतं. याबाबतचा खुलासा नुपूरनेच केला आहे.पहिल्यांदा टेक्स्ट मेसेज पाठवला, त्यानंतर कॉल केला होता. तिसऱ्यांदा समोरासमोर भेटून प्रेम व्यक्त केलं होतं.

भुवनेश्वर कुमार आणि नुपूर एकाच कॉलनीत राहात होते. या दोघांच्या प्रेमाबाबत घरच्यांना सुतराम कल्पना नव्हती. दोघं एकमेकांना लपूनछपून भेटायचे. त्याचबरोबर कोणी बघितलं तर आपलं काय खरं नाही, अशी भीतीही असायची. तीन चार वर्षांनंतर घरच्यांना दोघांच्या प्रेमाबाबत कळलं. तेव्हा भुवनेश्वर कुमारनं सुटकेचा निश्वास सोडला. कारण घरच्यांना प्रेमाबाबत सांगण्याची हिम्मत नव्हती, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं.

नुपूरनं विचारलं क्रिकेटनंतर काय करणार?

नुपूरने माझ्या प्रेमाला होकार दिला आणि आमच्या भेटीगाठी सुरु झाल्या. तेव्हा नुपूरनेच माझा इंटरव्यू घेतला. क्रिकेटनंतर नोकरी काय करणार? असा प्रश्न विचारलं. तेव्हा मला उत्तरच देता आलं नाही.तेव्हा मी सांगितलं क्रिकेटच माझं करिअर आहे. परत तिनं विचारलं त्यानंतर काय करणार आहेस? तेव्हा मी सांगितलं क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी आहे आणि त्यानंतर भारतासाठी खेळण्याची संधी मिळते.  तेव्हा ती बोलली असं पण असतं का? आई वडील सोडा पहिला इंटरव्यू नुपूरनेच घेतला.ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.

गोलंदाजीत स्विंग गणित कसं जमलं?

गोलंदाजीत स्विंगचं गणित नुपूरमुळेच जमलं असं भुवी मिश्किलपणे सांगितलं.”आम्ही दोघं इतके जवळ राहात होतो की, मी दगड फेकला तर थेट तिच्या घरात जाईल.तिचं घरं माझ्या घरापासून डावीकडे आहे. तिला चिठ्ठी देताना दगड समोरच्या घरातून डावीकडे फेकावा लागायचं. तो बरोबर स्विंग होत तिच्याकडे अशा पद्धतीने..तेथून स्विंग आलं खरं तर..तेव्हा तिच्या घराच्या समोर एक झाडं मोठं होऊन आलं. तेव्हा दगड उजवीकडून फेकावा लागायचा. तेव्हा इनस्विंग आला..त्यामुळे इनस्विंग आणि आऊटस्विंगची प्रॅक्टिस झाली.”

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.