Irfan Pathan | अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे चित्रपट सृष्टीत पदार्पण!

एकेकाळी भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा इरफान पठाण (Irfan Pathan)आता चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे.

Irfan Pathan | अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचे चित्रपट सृष्टीत पदार्पण!
Irfan
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 7:31 PM

मुंबई : एकेकाळी भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा इरफान पठाण (Irfan Pathan)आता चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. इरफान हिंदीत नाही, तर तमिळ चित्रपटात डेब्यू करणार आहे. इरफानच्या 36व्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, या चित्रपटातील त्याचे पहिले पोस्टर प्रकाशित झाले आहे. चित्रपटामध्ये काम करणारा इरफान पठाण पहिला खेळाडू नसून या अगोदर बऱ्याच खेळाडूनी चित्रपट सृष्टीमध्ये आपले नशीब अजमावले आहे.(Cricketer Irfan Pathan’s film debut)

इरफान पठाण ‘कोब्रा’ नावाच्या तमिळ चित्रपटातून पदार्पण करत आहे. यात इरफान पठाणचे नाव असलन यिलमाझ असेल आणि तो एका फ्रेंच इंटरपोल अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तमिळ सुपरस्टार चियान विक्रमदेखील दिसणार असल्याचे कळते आहे. यात विक्रम मुख्य भूमिकेत असेल तर, इरफानची छोटी भूमिका असणार आहे.चियान विक्रम या चित्रपटात भारतीय हेराची भूमिका साकारत असून, बर्‍याच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. आणि यात के एस रवी कुमार, श्रीनिधी शेट्टी यांच्यासारख्या कलाकारांनी देखील काम केले आहे. पुढील वर्षी हा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 35 व्या वर्षीय इरफान पठाणने क्रिकेटला गुडबाय केला होता. इरफानने टीम इंडियाकडून शेवटचा सामना 8 वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2012 मध्ये खेळला होता. कोलंबोमध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना इरफानचा शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. इरफानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली चषकात जम्मू काश्मीरचं प्रतिनिधीत्व केलं होतं. डावखुरा स्विगं गोलंदाज असलेल्या इरफानने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडिलेड कसोटीतून पदार्पण केलं होतं. डावखुरा स्विंग गोलंदाज म्हणून इरफानने तुफानी कामगिरी करत अल्पावधीतच नावलौकिक मिळवल होत. इरफानची तुलना माजी कर्णधार कपिल देव यांच्याशी केली जाते. कपिल देव यांच्यानंतर एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून इरफान पठाणकडे पाहिलं जात होतं.इरफानने 29 कसोटी सामन्यात 1105 धावा केल्या असून 100 विकेट घेतल्या आहेत. तर 120 वन डे सामन्यात इरफानने 1544 धावा करताना, तब्बल 173 विकेट आपल्या नावे केल्या आहेत. इरफान पठाण 24 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. यामध्ये त्याने 172 धावा केल्या तर 28 विकेट पटकावल्या. इरफान पठाण हा भारताने 2007 मध्ये जिंकलेल्या टी 20 विश्वचषकात भारतीस संघात होता. इतकंच नाही तर फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इरफान पठाणने जबरदस्त कामगिरी केल्याने तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. इरफानने 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करत हॅटट्रिक केली होती. इरफानने सलग तीन विकेट घेतल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

इरफान पठाणला अनुराग कश्यपबद्दल माहिती, पायल घोषचा नवा दावा

वय हे काहींसाठी संघाबाहेर काढण्यासाठीचं कारण, इरफान पठाणचा धोनीवर अप्रत्यक्ष हल्ला

(Cricketer Irfan Pathan’s film debut)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.